-

चिया बियांमध्ये अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) आणि झिंक (Zinc) सारखी खनिजे असतात, जी शरीराची रोगप्रतिकारशक्ती (Immunity) मजबूत करतात. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर संसर्गापासून दूर राहण्यासाठी हे आवश्यक आहे.
-
चिया बियांमध्ये प्रोटीन (Protein) आणि हेल्दी फॅट्स (Healthy Fats) जास्त प्रमाणात असतात, ज्यामुळे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते.
-
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि आळस कमी करण्यासाठी ही ऊर्जा खूप महत्त्वाची आहे.
-
चिया बियांमध्ये फायबरचे (Fiber) प्रमाण खूप जास्त असते. हे फायबर पचनसंस्था (Digestion) चांगली ठेवण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची (Constipation) समस्या दूर करते, जी हिवाळ्यात सामान्यपणे जाणवते.
-
थंडीत त्वचा कोरडी पडते. चिया बियांमधील ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स (Omega-3 Fatty Acids) त्वचेचा नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करतात.
-
१ चमचा चिया बिया अर्धा ग्लास पाण्यात रात्रभर किंवा कमीतकमी १ तास भिजवा. त्यांना सकाळी रिकाम्या पोटी खा.
-
तुम्ही या भिजवलेल्या बिया दही (Curd), स्मूदी (Smoothie) किंवा ओटमील (Oatmeal) मध्ये घालून देखील खाऊ शकता.
रोगप्रतिकारशक्ती ते पचनक्रिया..; थंडीच्या दिवसात चिया बिया खाल्ल्याने होतात ‘हे’ फायदे
हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि आळस कमी करण्यासाठी ही ऊर्जा खूप महत्त्वाची आहे.
Web Title: Winter 2025 these are the health benefits of eating chia seeds immunity digestion photos sdn