• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. man kills 14 family members commits suicide in thane

‘दावत’.. मृत्यूची!

एकाच कुटुंबातील १४ जणांची गळा चिरून निर्घृण हत्या

February 28, 2016 12:39 IST
Follow Us
  • एकाच कुटुंबातील १४ जणांच्या हत्येच्या वृत्तानेच ठाणेकरांचा रविवार उजाडला. कासारवडली गावात राहात असलेल्या वरेकर कुटुंबात शनिवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडले.
    1/

    एकाच कुटुंबातील १४ जणांच्या हत्येच्या वृत्तानेच ठाणेकरांचा रविवार उजाडला. कासारवडली गावात राहात असलेल्या वरेकर कुटुंबात शनिवारी मध्यरात्री हे हत्याकांड घडले.

  • 2/

    हत्याकांड करणारा हसनैन वरेकर (३५) हा घरातला कर्ताधर्ता मुलगा. घरात आई-वडील, पत्नी, दोन मुली (त्यातील एक अवघ्या तीन महिन्यांची), एक अविवाहित बहीण असा परिवार.

  • 3/

    हसनैनने शनिवारी घरी ‘दावत’ आयोजित केली. त्यासाठी माहेरी प्रसूतीसाठी गेलेली पत्नी जबीन (२८) हिला तो तान्ह्य़ा मुलीसह घरी घेऊन आला.

  • 4/

    तीनही विवाहित बहिणींनाही मुलाबाळांसह खास आग्रह करून हसनैनने घरी बोलावून घेतले. भिवंडीत राहणाऱ्या सुबिया हिला तर तिच्या पाच महिन्यांच्या मुलीसह तो मोटारसायकलवरून घेऊन आला.

  • 5/

    शनिवारी रात्री ठरल्याप्रमाणे वरेकर कुटुंबियांचा ‘दावत’चा कार्यक्रम आनंदात पार पडला.

  • 6/

    सर्वजण दुमजली घरामध्ये झोपी गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास हसनैनने आई-वडिलांसह पत्नी, दोन मुली, चार बहिणी आणि त्यांची मुले अशा एकूण १५ जणांच्या गळ्यावर तीक्ष्ण सुरीने वार केले. त्यामध्ये १४ जणांचा जागीच मृत्यू झाला तर सुबिया मात्र या हल्ल्यात जखमी झाली.

  • 7/

    हसनैनच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सुबियाने त्याला प्रतिकार करत स्वतला एका खोलीत कोंडून घेतले.

  • 8/

    सर्व नातेवाइकांची अतिशय थंड डोक्याने हत्या केल्यानंतर हसनैनने घरामध्येच नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • 9/

    दरम्यान, घरात कोंडून घेतलेल्या बहिणीने जखमी अवस्थेत शेजाऱ्यांना मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर शेजाऱ्यांनी धाव घेऊन घराची ग्रील तोडली आणि तिला घराबाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले.

  • 10/

    रविवारी सायंकाळी पोलिसांनी सुबियाचा जबाब नोंदवून घेतला, मात्र त्यामध्येही हत्याकांडाचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • 11/

    हत्याकांडाच्या घटनेनंतर भेदरलेल्या सुबियाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार हसनैन हा नेहमी ‘मेरे सरपे भूत सवांर है, मैं सबको खतम कर दूँगा’, अशी सारखी बडबड करायचा.

  • आपण हसनैनच्या बडबडीकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले नाही, असे सुबिया म्हणाली.
  • 12/

    मालमत्ता वादातून ही घटना घडल्याची चर्चा असल्याने पोलीस वरेकर कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती गोळा करणार आहेत

  • 13/

    वरेकर कुटुंबियांच्या घरात दोन प्रकारच्या गोळ्या सापडल्या आहेत. त्यापैकी एक मानसिक उपचारासंबंधीच्या गोळ्या असल्याचा पोलिसांना संशय आहे. या गोळ्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

  • सुबियाने दिलेल्या माहितीच्या आधारे हत्याकांडाचे काही धागेदोरे लागतात का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
  • सुबियाने दिलेल्या माहितीच्या आधारे हत्याकांडाचे काही धागेदोरे लागतात का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
  • सुबियाने दिलेल्या माहितीच्या आधारे हत्याकांडाचे काही धागेदोरे लागतात का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
  • सुबियाने दिलेल्या माहितीच्या आधारे हत्याकांडाचे काही धागेदोरे लागतात का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
  • 14/

    पोलिसांच्या प्राथमिक तपासात कौटुंबिक वादातून ही घटना घडली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र हंसीलच्या बहिणीकडून याबाबत अधिकृतपणे माहिती मिळू शकेल. सध्या सुबियावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 15/

    आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केली तेव्हा त्याच्या हातामध्ये चाकू होता. या घटनेत हंसीलची बहिण सुबिया भरमल बचावली असून, तिने पहाटे आरडाओरडा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

  • हंसीलने आपल्या बहिणी आणि भाच्यांसाठी घरी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वजण हंसीलच्या घरी मुक्कामाला राहिले. त्यानंतर मध्यरात्री १च्या सुमारास हंसीलने त्याचे आई-वडिल, पत्नी, दोन मुली, बहिणी आणि भाच्यांची निर्घृणपणे हत्या केली आणि स्वतः गळफास घेतला.
  • 16/

    वडवली मशिदीजवळ राहणा-या हंसील वरेकरने (वय ३५) आपल्या कुटुंबातील १४ जणांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊऩ आत्महत्या केली. मृतांमध्ये सात मुले, सहा महिला व एक पुरुष यांचा समावेश आहे.

  • 17/

    एकाच कुटुंबातील १४ जणांची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कासारवडवली परिसरात शनिवारी रात्री घडली. या घटनेमुळे ठाण्यासह महाराष्ट्र हादरून गेला आहे.

TOPICS
ठाणेThaneठाणे न्यूजThane News

Web Title: Man kills 14 family members commits suicide in thane

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.