-
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे आज अर्थात शुक्रवारी त्याची तुरुंगातून सुटका होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
-
मात्र, आर्यन खानच्या सुटकेमध्ये अजूनही बरेच सोपस्कार पार पडणं आवश्यक आहे. त्यामुळेच ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनीही आर्यनची सुटका शुक्रवारी किंवा शनिवारी होण्याची शक्यता वर्तवली होती.
-
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी संध्याकाळी आर्यन खानला जामीन मंजूर केला. मात्र, न्यायालयाच्या निकालाची ऑर्डर गुरुवारी संध्याकाळी मिळू शकली नाही. ती आज मिळू शकेल.
-
ही ऑर्डर घेण्यासाठी न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या दालनाच्या बाहेरच आर्यन खानच्या प्रकरणाचं काम करणाऱअया वकील आनंदिनी फर्नांडिस यांना लीगल टीमनं थांबण्याची जबाबदारी सोपवल्याचं सांगितलं जात आहे.
-
ही ऑर्डर मिळाल्यानंतर आर्यन खानच्या लीगल टीमला पुन्हा एकदा एनडीपीएसच्या विशेष न्यायालयात जावं लागेल. कारण आर्यन खानची कस्टडी सध्या विशेष न्यायालयाकडे आहे.
-
जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने काही रक्कम जातमुचलक्यावर जमा करण्याचे आदेश दिल्यास ती रक्कम विशेष न्यायालयात जमा करावी लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आर्यन खानच्या सुटकेचे आदेश विशेष न्यायालयाकडून निघतील.
-
हा आदेश मिळाल्यानंतर संध्याकाळी साडेपाचच्या आत लीगल टीमला त्या आदेशाची प्रत आर्थर रोड तुरुंगाबाहेरच्या बॉक्समध्ये टाकावी लागेल.
-
दररोज सकाळी ८ आणि संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास असे दिवसातून दोनदाच हे बॉक्स उघडले जातात. त्यामुळे आर्यन खानच्या सुटकेचे आदेश संध्याकाळी साडेपाचपूर्वीच या बॉक्समध्ये पडायला हवेत.
-
जर या कोणत्याही टप्प्यावर उशीर झाला आणि पेपर बॉक्समध्ये पडण्यास साडेपाचची वेळ उलटून गेली, तर मात्र आर्यन खानला आजही तुरुंगातच राहावं लागू शकतं.
-
सर्व कागदपत्रांची पूर्तता वेळीच झाली, तर आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा हे तिघे आज संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुरुंगातून बाहेर येऊ शकतात.
Photo : आधी हाय कोर्टाची ऑर्डर, मग पुन्हा स्पेशल कोर्ट आणि नंतर आर्थर रोड जेलबाहेरचा बॉक्स! आर्यन खानच्या सुटकेसाठी ‘लंबी रेस’!
आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला, तरी त्याच्या तुरुंगातून सुटकेसाठी बरेच सोपस्कार पार पाडावे लागणार असून त्यासाठी लीगल टीम प्रयत्न करत आहे.
Web Title: Aryan khan latest news legal team waiting for release order bail granted by bombay high court pmw