-
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत सोमवारी (१५ नोव्हेंबर) पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी मालवली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
-
यानंतर बाबासाहेब पुरंदरे यांचा मृतदेह सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी त्यांच्या पर्वती येथील निवासस्थानी नेण्यात आला. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं अखेरचं दर्शन घेतलं.
-
राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती.
-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं.
-
खासदार उदयनराजे भोसले यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं दर्शन घेताना बाबासाहेबांचे काळाच्या पडद्याआड जाणं मनाला चटका लावणारं असल्याची भावना व्यक्त केली.
-
“बाबासाहेबांचा सातारच्या छत्रपती घराण्याशी वेगळाच ऋणानुबंध होता. ‘शिवशाहीर’ ही पदवी आमच्या आजी राजमाता श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे भोसले यांनीच त्यांना साताऱ्यात सन्मानानं बहाल केली होती,” अशी आठवण खासदार उदयनराजे भोसले यांनी सांगितली.
-
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील बाबासाहेब पुरंदरे यांचं अंतिम दर्शन घेतलं.
-
अभिनेत्री मृणाल कुलकर्णीने बाबासाहेब पुरंदरे यांचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
-
बाबासाहेबांवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
-
यावेळी महिला पोलिसांच्या विशेष पथकाने बाबासाहेब पुरंदरे यांना सलामी दिली.
-
यावेळी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित होता.
-
उपस्थित सर्वांनाच बाबासाहेब पुरंदरे यांच्या अखेरच्या दर्शनाची ओढ लागली होती.
-
त्यामुळे सर्वांना बाबासाहेब पुरंदरे यांचं दर्शन घेता यावं म्हणून व्यवस्था करण्यात आली. यावेळी लांबच लांब रांग लागलेली पाहायला मिळाली.
Photos : बाबासाहेब पुरंदरे यांच्या अखेरच्या दर्शनाला दिग्गज नेत्यांपासून कलाकार हजर, महिला पोलीस पथकाकडून मानवंदना
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं अखेरचं दर्शन घेतलं.
Web Title: Photos of funeral of babasaheb purandare in pune raj thackeray and other leader present pbs