• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. thinking that without congress anybody can defeat bjp is merely a dream congress general secretary kc venugopal abn

“काँग्रेसशिवाय भाजपाला कोणीही पराभूत करू शकत नाही”; ममतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा पलटवार

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

December 1, 2021 18:11 IST
Follow Us
  • काँग्रेस पक्ष बंगालमध्ये निवडणूक लढवू शकतो तर तृणमूल काँग्रेस गोव्यात का लढू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करुन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    1/18

    काँग्रेस पक्ष बंगालमध्ये निवडणूक लढवू शकतो तर तृणमूल काँग्रेस गोव्यात का लढू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करुन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  • 2/18

    त्रिपुरातील निवडणूक लढवल्यानंतर ममता बॅनर्जी आता गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.

  • 3/18

    मुंबईतील एका बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या, मला भाजपला या देशातून राजकीयदृष्ट्या बाहेर पाहायचे आहे. काँग्रेस बंगालमध्ये लढू शकते तर मी गोव्यात का लढू शकत नाही?

  • 4/18

    ममता बॅनर्जी यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना भाजपच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन करत सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आल्यास भाजपाचा पराभव करणे सोपे जाईल, असे म्हटले आहे.

  • 5/18

    ममता बॅनर्जी यांनी भाजपा केंद्र सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेणे आणि डिझेल आणि पेट्रोलचे दर कमी करणे हा निवडणुकीचा स्टंट असल्याचे म्हटले आहे.

  • 6/18

    मात्र आता देशात काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही दृष्टिकोन बदलताना दिसत आहे.

  • 7/18

    शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी देशात  यूपीए नाही असे राष्ट्रवादीचे नेत्यांनी म्हटल्याचे बरोबर आहे असे म्हटले आहे.

  • 8/18

    सध्या सुरू असलेल्या फॅसिझमशी लढण्यास कोणीही तयार नसल्याने सशक्त पर्याय देण्याची गरज आहे. यूपीए नाही असे शरद पवार जी म्हणाले ते मला मान्य आहे, असे ममता म्हणाल्या.

  • 9/18

    दरम्यान, काँग्रेस पक्ष हा यूपीएचा मुख्य पक्ष आहे. तसेच संयुक्त पुरोगामी आघाडी आणि राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष त्याचा भाग आहेत.

  • 10/18

    नेतृत्वासाठी भक्कम पर्याय दिले पाहिजेत. आमचा विचार आजचा नसून निवडणुकीचा आहे. असा पर्याय प्रस्थापित झाला पाहिजे आणि त्यासाठी ममता बॅनर्जी भेटायला आल्या होत्या. त्यांच्याशी सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

  • 11/18

    आजच्या युगात समान विचार असलेल्या पक्षांनी एकत्र यायला हवे, असे त्यांचे मत आहे. राष्ट्रीय स्तरावर संघटित असतानाच त्यांना सक्षम पर्यायी नेतृत्व दिले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.

  • 12/18

    ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यांनंतर आता काँग्रेसकडूनही या संदर्भात प्रतिक्रिया आली आहे.

  • 13/18

    भारतीय राजकारणातील वास्तव सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसशिवाय भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही, असा विचार करणे हे केवळ स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे.

  • 14/18

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सतत देशभर दौरे करत आहेत आणि बिगर-काँग्रेस विरोधी पक्षांच्या भेटी घेऊन स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत.

  • 15/18

    नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यातही सोनिया गांधी यांची भेट न घेण्याबाबत प्रश्न विचारला असता, ममता बॅनर्जी यांनी प्रत्येक वेळी त्यांना भेटावे असे घटनेत लिहिले आहे का, असा टोला लगावला होता.

  • 16/18

    तर २०२४ च्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना विरोधी पक्षाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा निर्णय तृणमूलने घेतला आहे.

  • 17/18

    ममता बॅनर्जी स्वत:ला पंतप्रधान चेहरा म्हणून सादर करू इच्छितात, म्हणूनच त्या राहुल गांधी आणि काँग्रेसला अभिव्यक्ती देण्याच्या विचारामध्ये नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. (फोटो सौजन्य- Tashi Tobgyal)

  • 18/18

    या रणनीतीनुसार ममता देशभरात ज्या राज्यांमध्ये काँग्रेसची संघटना कमकुवत आहे किंवा भाजपाच्या विरोधात उभे राहण्याच्या स्थितीत नाही, अशा राज्यांमध्ये फिरत आहे. (सौजन्य: West Bengal CMO)

TOPICS
काँग्रेसCongressममता बॅनर्जीMamata Banerjeeराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Thinking that without congress anybody can defeat bjp is merely a dream congress general secretary kc venugopal abn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.