• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. pune women sheetal mahajan an indian sky diver jump from 6000 feets in nauvari saree sets a new record kak

Photos : नऊवारी साडीत पॅराजम्पिंग करणारी पहिली भारतीय महिला; पुण्याच्या शीतल महाजनची कमाल

शीतल महाजन यांना २०११ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Updated: January 28, 2022 15:46 IST
Follow Us
  • स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिन असा दुहेरी योग साधून पुण्याच्या शीतल महाजन यांनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्पिंग करत राष्ट्रीय विक्रम केला.
    1/12

    स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिन असा दुहेरी योग साधून पुण्याच्या शीतल महाजन यांनी पारंपारिक नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्पिंग करत राष्ट्रीय विक्रम केला.

  • 2/12

    अशाप्रकारे नऊवारी साडी परिधान करून पॅराजम्प करणाऱ्या शीतल पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

  • 3/12

    हडपसर येथील ग्लायिडग सेंटर येथे पॅरामोटरच्या साहाय्याने पाच हजार फुटांवरून त्यांनी पॅराजम्पिंग केले.

  • 4/12

    शीतल महाजन या सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांनी स्कायडायव्हिंग खेळाचे प्रशिक्षण घेतले आहे.

  • 5/12

    आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतलेला आहे. आतापर्यंत त्यांच्या नावावर १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम केल्याची नोंद आहे.

  • 6/12

    जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणाऱ्या शीतल या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांना २०११ साली पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

  • 7/12

    शीतल यांच्या पराक्रमाची दाखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी त्यांना सबिहा गोकसेन सुवर्ण पदक देऊन सन्मानित केलं आहे. एरो स्पोर्ट्समध्ये भारतासाठी हे पदक मिळवणाऱ्या त्या पहिली भारतीय महिला ठरल्या आहेत.

  • 8/12

    रॉन मेनेज यांच्या पॅरामोटारमधून जमिनीपासून आकाशात सहा हजार फुटांवर जाऊन नंतर पॅरामोटारमधून बाहेर पडत शीतल यांनी आकाशात पक्ष्यासारखी झेप घेतली. जमिनीच्या दिशेने वेगात येत असतानाच साडेतीन हजार फूट उंचीवर त्यांनी पॅराशूट उघडले. या उपक्रमासाठी शीतल यांना ग्लायिडग सेंटरचे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभल्याचं त्या सांगतात.

  • 9/12

    “आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंग केले. परंतु, जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजम्पिंग केल्याने ही पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.”, अशी भावना शीतल महाजन यांनी व्यक्त केली.

  • 10/12

    १७ सप्टेंबर २०१८ रोजी शीतल यांनी दहा हजार फूट उंचीवरून पॅराजम्पिंग करत पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.

  • 11/12

    शीतल यांनी २०२१ मध्ये इजिप्त या देशात पॅराजम्पिंग केले होते. यावेळी त्यांनी तेथील पारंपरिक पेहराव केला होता.

  • 12/12

    इजिप्तमधील गिझा शहरातील पुरातन असणाऱ्या पिरॅमिड्स येथून त्यांनी हे पॅराजम्पिंग केले होते.

TOPICS
पुणेPuneपुणे न्यूजPune News

Web Title: Pune women sheetal mahajan an indian sky diver jump from 6000 feets in nauvari saree sets a new record kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.