• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. russian presidemt vladimir putin wealth watches worth super yacht 700 cars sgy

PHOTOS: ७०० गाड्या, ५८ विमानं, १९ घरं, आलिशान हवेली अन् कोट्यवधींची घड्याळं; पुतीन यांच्या संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

पुतीन हे नेहमीच जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याचं मानलं जात आहे

March 23, 2022 18:10 IST
Follow Us
  • रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला असून दुसऱ्या महायुद्धातनंतर पहिल्यांच जग अशा युद्धाला सामोरं जात आहे. यासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वाधिक प्रभावशाली असणाऱ्या पुतीन यांचं नाव चर्चेत आलं आहे. (File Photos)
    1/19

    रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने संपूर्ण जगाला धक्का बसला असून दुसऱ्या महायुद्धातनंतर पहिल्यांच जग अशा युद्धाला सामोरं जात आहे. यासोबतच संपूर्ण जगाचं लक्ष आंतरराष्ट्रीय राजकारणातील सर्वाधिक प्रभावशाली असणाऱ्या पुतीन यांचं नाव चर्चेत आलं आहे. (File Photos)

  • 2/19

    केजीबी अधिकारी राहिलेल्या पुतीन यांच्याबद्दल नेहमीच अनेकांना उत्सुकता राहिली आहे. यानिमित्ताने त्यांच्या लाइफस्टाइलबद्दल जाणून घेऊयात.

  • 3/19

    फॉच्युननुसार, पुतीन वर्षाला १ लाख ४० हजार डॉलर्स कमावतात.

  • 4/19

    या अहवालानुसार, सार्वजनिकरित्या घोषित केलेल्या मालमत्तेत ८०० चौरस फुटांचे अपार्टमेंट, एक ट्रेलर आणि तीन कार आहेत.

  • 5/19

    पण पुतीन हे नेहमीच जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याचं मानलं जात आहे.

  • 6/19

    गुंतवणूक आणि मालमत्ता व्यवस्थापन कंपनी हर्मिटेज कॅपिटल मॅनेजमेंटने २०१७ मध्ये केलेल्या दाव्यानुसार, पुतिन यांची वैयक्तिक संपत्ती २०० बिलियन डॉलर आहे. कंपनीचे सीईओ बिल ब्राउडर यांनी यूएस सिनेटच्या न्यायिक समितीसमोर हा दावा केला होता.

  • 7/19

    ब्राउडर हे १९९० च्या दशकात रशियामध्ये मोठे गुंतवणूकदार असल्याने त्यांचा दावा गांभीर्याने घेण्यात आला होता.

  • 8/19

    पुतीन यांच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या संपत्तीबद्दल नेहमीच अनेक दावे केले जात असतात.

  • 9/19

    फॉर्च्यूनच्या म्हणण्यानुसार, पुतिन Patek Philippe चे ६० हजार डॉलर्सचं Perpetual Calendar आणि A Lange & Sohne Toubograph चं ५ लाखांची महागडी घड्याळं वापरतात.

  • 10/19

    दोन वर्षांपूर्वी एबीसी न्यूजने एका व्हिडीओच्या आधारे सादर केलेल्या रिपोर्टमध्ये पुतीन यांनी आपल्या पगाराच्या सहा पट महागडं ७ लाख डॉलर्सचं घड्याळ घातलं असल्याचा दावा केला होता.

  • 11/19

    पुतीन हे समुद्राच्या कडेला उंच कड्यावर असणाऱ्या १९ हजार चौरस फुटांच्या हवेलीचे मालक असल्याचंही बोललं जातं. या हवेलीत संगमरवरी स्विमिंग पूल, स्पा, थिएटर, वेगास शैलीतील कॅसिनो आणि नाईट क्लब असल्याचं सांगितलं जातं.

  • 12/19

    रशियामधील विरोधी नेत्यांनी या हवेलीची फोटो प्रसिद्ध केले होते, ज्याला त्यांनी “Putin’s Country Cottage” असं म्हणतात. फोटोंमध्ये ५० हजार डॉलर्सचं बार टेबल, ८५० डॉलर्सचं डायनिंग रूम फर्निचर, ५४ हजार डॉलर्सचा बार टेबल, ८५० डॉलर्सचे इटालियन टॉयलेट ब्रशेस आणि १२५० डॉलर्सचे टॉयलेट पेपर होल्डरसह सजवलेले बाथरूम दाखवण्याचा दावा केला होता.

  • 13/19

    परंतु बीबीसीने , यावर्षी जानेवारीमध्ये आर्काडी रोटेनबर्ग यांनी या हवेलीचे मालक असल्याचं म्हटलं होतं.

  • 14/19

    पुतीन यांच्याकडे हवेलीसोबतच १९ घरं, ७०० गाड्या, ५८ विमानं आणि हेलिकॉप्टर्स असल्याचा दावा आहे. यामध्ये असणाऱ्या “The Flying Kremlin” विमानाचा खर्च ७१६ मिलियन डॉलर्स असून त्यात सोन्यापासून तयार केलेलं टॉयलेट असल्याचं सांगितलं जातं.

  • 15/19

    द गार्डियनने इटलीमधील १४० मीटर लांब, सहा मजली सुपर यॉटचा फोटो छापला होता, जो पुतीन यांच्या मालकीचा असल्याचं सांगितलं जातं. याची किंमत ७०० मिलियन डॉलर्स आहे.

  • 16/19

    इटालियन संसदेत मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी ही बोट जप्त करण्याची मागणी केली.

  • 17/19

    इतकी संपत्ती असतानाही पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांच्यावर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत.

  • 18/19

    युक्रेनवर अतीक्रमण केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी पुतीन यांचे निकटवर्तीय तसंच अनेक श्रीमंतांवर निर्बंध आणले असून प्रवासावर बंदी आणली आहे. पण पुतीन यांच्यावर मात्र कोणतीही बंदी किंवा निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

  • 19/19

    न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तासनुसार, युरोपियन देशांनी रशियाच्या नेतृत्वासोबत चर्चेचा मार्ग खुला राहावा यासाठीच हे निर्बंध लावण्यात आलेले नाहीत.

TOPICS
युक्रेन संघर्षUkraine CrisisरशियाRussiaव्लादिमिर पुतिनVladimir Putin

Web Title: Russian presidemt vladimir putin wealth watches worth super yacht 700 cars sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.