Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jail me but do not attack families says uddhav thackeray scsg

“वाटल्यास मला तुरुंगात टाका, पण…”, “सत्ता हवी आहे ना तर…”; मुख्यमंत्र्यांचं भाजपाला आव्हान

सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केल्यानंतर ते पहिल्यांदाच बोलत होते

Updated: March 26, 2022 17:27 IST
Follow Us
  • Jail me but do not attack families says Uddhav Thackeray
    1/25

    हा दाऊद आहे कुठे? निवडणुकीसाठी हा विषय किती काळ वापरणार? तुम्ही आधी रामाच्या नावाने मते मागितली आता दाऊदच्या नावाने मागणार का? अशी सरबत्ती करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर प्रतिहल्ला चढवला.

  • 2/25

    विरोधी पक्षीय नेत्यांच्या मालमत्तांवर छापे टाकणारी ‘ईडी’ आहे की तुमचा घरगडी, असा सवालही ठाकरे यांनी केला.

  • 3/25

    गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदला फरफटत आणण्याची घोषणा केली होती. पण आता दाऊदच्या मागे आपण फरफटत चाललो आहोत. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ओसामा बिन लादेनच्या नावाने मते मागितली नाहीत, तर त्यांनी घरात घुसून लादेनला ठार केले, असा टोलाही ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

  • 4/25

    विरोधी पक्षाने मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य भाजपा नेत्यांचे आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर देणारे भाषण केले.

  • 5/25

    सत्तेसाठी केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीतील नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांवर छापे टाकून तसेच त्यांची चौकशी करून बदनामी केली जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

  • 6/25

    हिंमत असेल तर समोरून अंगावर या मग मी आहे आणि तुम्ही आहात. कुटुंबीयांची बदनामी हा नीचपणा आणि विकृती आहे, असंही उद्धव यांनी यावेळी म्हटलं.

  • 7/25

    केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून दहशत निर्माण करण्याचे काम सुरू आहे. लढण्याची ताकद नाही म्हणून शिखंडीला पुढे करून महाभारतात युद्ध लढले गेले तसे आता सुरू आहे. कुटुंबीयांना बदनाम करायचे, छापे टाकायचे, मालमत्तेवर टाच आणायची हे सारे सुरू आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

  • 8/25

    मी टीकेला आणि बदनामीला घाबरत नाही. मी कसा आहे हे सगळय़ांना माहिती आहे. हे राज्य म्हणजे ध्रृतराष्ट्र नाही, हा छत्रपतींचा लढवय्या महाराष्ट्र आहे. अशा आरोप-प्रत्यारोपांतून काही मिळणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी भाजपाला सांगितलं.

  • 9/25

    करोनाकाळात लोकांना वाचवण्यासाठी तातडीने प्राणवायूसह औषधे आणि इतर गोष्टी खरेदी केल्या. अल्पकालीन निविदा काढून काम केले असे सांगत त्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळला. 

  • नितीन गडकरी म्हणाले होते आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. हर्षवर्धन पाटील यांना तेव्हा झोप लागत नव्हती. आता ते तुमच्याकडे आल्यानंतर शांतपणे झोपत आहेत हे त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितले, असा टोलाही उद्धव यांनी लगावला.
  • 10/25

    तुमच्याकडे आल्यावर सगळे शुद्ध कसे होतात, असा सवाल करत तुमच्याकडे आल्यानंतर शांत झोप कशी लागते हे त्यांना एकदा विचारावे लागेल, असा चिमटाही ठाकरे यांनी काढला.

  • 11/25

    तुमचे प्रवक्ते वा दलाल कोण तुरुंगात जाणार, हे जाहीर करत असतात. ते केंद्रीय यंत्रणांचे दलाल आहेत का, असा सवाल ठाकरे यांनी केला.

  • 12/25

    इंदिरा गांधी यांनी जाहीरपणे आणीबाणी घोषित केली. पण देशात अघोषित आणीबाणी आहे. जाहीर आणीबाणी लावायला धारिष्ट्य लागते, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी भाजपावर केली.

  • 13/25

    मी हिंदूत्वापासून फारकत घेतली नाही. मी कडवा हिंदूुत्ववादी आहे आणि राहणारच, माझे विचार कधीही बदलले नाहीत. पण मुद्दसर लांबे आणि नवाब मलिक यांच्या नावाचा वापर करून व त्यांचा दाऊदशी संबंध जोडून वेगळे वातावरण तयार केले जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 14/25

    या लांबेच्या हस्ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माहीम दग्र्यात हार घालून सत्कार करतानाची छायाचित्रे सर्वत्र उपलब्ध आहेत. इतकेच नव्हे तर दाऊदशी संबंधित असल्याचा आरोप केलेल्या या लांबेची नियुक्ती फडणवीस सरकारच्या काळातच झाली होती, अशी आठवण उद्धव ठाकरेंनी करुन दिली. त्यावेळचे मंत्री विनोद तावडे यांनी हिरव्या शाईने नियुक्ती पत्रावर सही केली होती, याकडे ठाकरे यांनी लक्ष वेधले.

  • 15/25

    नवाब मलिकांवर तथ्यहीन आरोप केले जातात. केंद्रीय संस्था एवढय़ा पोकळ झाल्या आहेत का? नवाब मलिक दाऊदचे हस्तक होते तर आधीच कारवाई का झाली नाही? ते सातत्याने निवडून येत असताना या यंत्रणांना काहीच कसे कळले नाही?, असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले.

  • 16/25

    नवाब मलिकांवर तथ्यहीन आरोप केले जातात. केंद्रीय संस्था एवढय़ा पोकळ झाल्या आहेत का? नवाब मलिक दाऊदचे हस्तक होते तर आधीच कारवाई का झाली नाही? ते सातत्याने निवडून येत असताना या यंत्रणांना काहीच कसे कळले नाही?, असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केले.

  • 17/25

    केंद्रीय यंत्रणा तेव्हा काय करत होती? दिवे लावत होती का? की थाळ्या वाजवत होती? बाण लक्ष्यवेध करणारे हवेत, पण आता हे बाण हातात धरून खुपसले जात आहेत. ईडी एवढी बेकार आहे का, की ती तुम्ही दिलेल्या माहितीनुसार चौकशी करत आहे. ती ईडी आहे की घरगडी? काहीच कळत नाही, असा टोला मुख्यमंत्री ठाकरे यांनी लगावला.

  • 18/25

    तुमचा पहाटेच्या सरकारचा प्रयोग यशस्वी झाला असता तर याच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्या मांडीला मांडी लावून सरकारमध्ये बसले असता, असेही ठाकरे यांनी फडणवीस यांना सुनावले.

  • 19/25

    आमच्यावर टीका करा, पण महाराष्ट्राची बदनामी करत आहात त्याचाही विचार करा. वाईनविक्रीच्या धोरणावरून महाराष्ट्राला बेवडय़ांचे राज्य, छत्रपतींच्या राज्याला मद्यराष्ट्र म्हणालात, असं उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावलं.

  • 20/25

    राज्यातील नवीन धोरणानुसार वाईन ही कुलूपबंद दुकानात मिळणार आहे, याकडे लक्ष वेधत मध्य प्रदेशातील धोरणाबाबत का बोलत नाही, असा सवाल मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

  • 21/25

    रावणाचा जीव बेंबीत होता तसे काही जणांना सगळे काही मिळाले तरी त्यांचा जीव मुंबईत आहे. मुंबईसारखे शहर नाही. मी या शहरात जन्मलो त्यामुळे या शहरात जे जे हवे ते ते सर्वोत्तम हवे, यासाठी मी आग्रही आहे, असं उद्धव यांनी सांगितलं.

  • आज मुंबई महापालिकेच्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा म्हणून रांग लागते. आठ भाषांतून शिक्षण देणारी मुंबई ही एकमेव महापालिका आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.
  • 22/25

    सत्ता हवी आहे ना तर पेन ड्राइव्ह गोळा करू नका. मी तुमच्यासोबत येतो, सत्तेसाठी नाही. मला तुरुंगात टाका. बाबरीच्याखाली राममंदिर होते, तसे कृष्णजन्मस्थळाच्या खालच्या तुरुंगात मला टाका. तुरुंगात टाकले तरी मी सगळ्यांच्या वतीने ती जबाबदारी घेतो.

  • 23/25

    वाटल्यास मला तुरुंगात टाका, पण १९९२ च्या दंगलीवेळी मुंबईला वाचवणाऱ्या शिवसैनिकांना छळू नका, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिले. (सर्व फोटो एएनआय, पीटीआय आणि ट्विटरवरुन साभार)

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Jail me but do not attack families says uddhav thackeray scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.