• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mns raj thackeray ncp sharad pawar bjp devendra fadanvis pm narendra modi maharashtra politics sgy

PHOTOS: शरद पवारांना उद्धव की राज? विचारण्यापासून ते जातीपातीच्या राजकारणाचा आरोप; राज ठाकरे तेव्हाचे आणि आत्ताचे

राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांत भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी वा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. त्याच वेळी शरद पवार यांचे कौतुक केले होते.

April 5, 2022 18:34 IST
Follow Us
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली होती. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला.
    1/13

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानात झालेल्या मेळाव्यात आक्रमक हिंदूत्वाची भूमिका मांडतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर यथेच्छ टीका केली होती. शरद पवारांनी १९९९मध्ये राष्ट्रवादीची स्थापना केल्यापासूनच राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी केला.

  • 2/13

    राज ठाकरे यांनी सभेत भाजप नेत्यांच्या सुरात सूर मिसळला.

  • 3/13

    पण याच राज ठाकरे यांनी गेल्या काही वर्षांत भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी वा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत टीका केली होती. त्याच वेळी शरद पवार यांचे कौतुक केले होते.

  • 4/13

    राजकीय समीकरणे बदलल्यानेच बहुधा एकेकाळी टीकेचे धनी झालेले फडणवीस आता राज ठाकरे यांची भूमिका बरोबर आहे असे बोलू लागले आहेत.

  • 5/13

    जाणून घेऊयात राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी, माजी मुख्यमंत्री फडणवीस व राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेली काही विधाने

  • 6/13

    इतके खोटे बोलणारा पंतप्रधान बघितला नाही (ऑक्टोबर २०१७)

  • 7/13

    मोदी पंतप्रधान असले तरी त्यांचे सारे लक्ष हे गुजरातकडे असते (मार्च २०१९)

  • 8/13

    एक असतो बसलेला मुख्यमंत्री तर एक असतो बसविलेला मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा बसविलेला मुख्यमंत्री निर्णय घेऊ शकत नाही. (सप्टेंबर २०१५)

  • 9/13

    महाराष्ट्र गेली ६० वर्षे शरद पवार हे शरदचंद्र दर्शन करत आहे. ६० वर्षे सातत्य ठेवणे ही सोपी गोष्टी नाही. या वयात इतक्या व्याधी घेऊन फिरतात, काम करतात ही विलक्षण गोष्ट आहे. (फेब्रुवारी २०१८)

  • 10/13

    लाव रे तो व्हिडीओ – मोदी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारा सचित्र पुरावा (लोकसभा निवडणूक २०१९ च्या प्रचारात)

  • 11/13

    ही कोणती लोकशाही. विरोधात बोलल्यास अशा पद्धतीने आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. ईडीच्या चौकशीनंतर माझे तोंड गप्प होणार नाही. ज्यांना धमक्या दिल्या ते भाजपमध्ये गेले. मला अशा नोटिसींचा काही फरक पडत नाही. (ईडीच्या नोटिसीनंतर प्रतिक्रिया ऑगस्ट २०१९)

  • 12/13

    कलम ३७० रद्द केल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. मग ज्या राज्यांमध्ये कलम ३७० नाही तेथे रोजगाराच्या संधी का उपलब्ध होत नाहीत. देशात बेरोजगारी वाढत आहे त्यावर मोदी काही बोलत नाहीत. ( ऑगस्ट २०१९)

  • 13/13

    पुण्यात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. यावेळी त्यांनी रॅपिड फायरमध्ये उद्धव की राज असा प्रश्न विचारला होता. यावर शरद पवारांनी ठाकरे कुटुंबीय असं उत्तर दिलं होतं.

TOPICS
मनसेMNSराज ठाकरेRaj Thackerayशरद पवारSharad PawarशिवसेनाShiv Sena

Web Title: Mns raj thackeray ncp sharad pawar bjp devendra fadanvis pm narendra modi maharashtra politics sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.