• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. chief minister uddhav thackeray criticized bjp on the issue of hindutva hinduhrudaysamrat and saffron msr

हिंदुत्व, हिंदुहृदयसम्राट अन् भगव्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपावर डागली तोफ!

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेत बोलताना फडणवीसांना दिलं प्रत्युत्तर; पाहा उद्धव ठाकरेंची मुख्य दहा विधानं

Updated: April 10, 2022 21:33 IST
Follow Us
  • “तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही.” (सर्व छायाचित्रे - संग्रहीत)
    1/2

    “तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व नाही सोडलं, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाही.” (सर्व छायाचित्रे – संग्रहीत)

  • 2/2

    “देशामध्ये भाजपाने एक बनावट हिंदुहृदयसम्राट निर्माण करण्याचा प्रयत्न केला; तो फसला, लोकांनी झिडकारला.”

  • 3/2

    “हिंदुहृदयसम्राटांबद्दल तुम्हाला जर एवढं प्रेम आहे, तर मग नवी मुंबई विमानतळाला हिंदुहृदयसम्राटांचं नाव द्यायला तुमचा विरोध का?”

  • 4/2

    “हिंदुहृदयसम्राटांबद्दल जर तुम्हाला एवढं प्रेम असेल, तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच(भाजपाने) त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याची नीच प्रयत्न केला होता.”

  • 5/2

    “एक गोष्ट लक्षात ठेवा, शिवसेना १९६६ मध्ये जन्माला आली तेव्हापासून शिवसेनेने आपला झेंडा, रंग, विचार, नेता कधीही बदलला नाही.”

  • 6/2

    “आम्ही उघडपणे सगळं करत आहोत, लपूनछपून काही करत नाही.”

  • 7/2

    “भगव्याच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत असं सांगितलं जातं, कोणता भगवा? हा छत्रपती शिवरायांच्या जो भगवा आहे तो खरा भगवा आहे, तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्याबाजूला हिरवा, निळा, पिवळा, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही.”

  • 8/2

    “तुमचा भगवा हा खरा भगवा नाहीच. अस्सल भगवा हा छत्रपती शिवरायांचा आणि साधुसंतांचा व आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे. त्याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाही, हा आमचा भगवा.”

  • 9/2

    “आज देखील आमच्या मनात आमच्या होर्डिंग्जवर सर्वत्रच शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही नेता, विचार, रंग आमच्याकडे नाही.”

  • 10/2

    “आज आमच्या हृदयात आणि होर्डिंग्जवरती शिवसेनाप्रमुख तर आहेतच, पण तुमच्या किती होर्डिंग्जवर अटलजी आणि अडवाणी आहेत?”

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayदेवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Sena

Web Title: Chief minister uddhav thackeray criticized bjp on the issue of hindutva hinduhrudaysamrat and saffron msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.