• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. raj thackeray upholds ultimatum regarding loudspeakers on mosques msr

मशिदींवरील भोंग्यासाठी दिलेल्या ‘अल्टिमेटम’वर राज ठाकरे ठाम; वाचा मनसेने काढलेल्या पत्रकातील ठळक मुद्दे

मशिदींवरील भोंगे काढले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा पठण केले जाणार, असं राज ठाकरे म्हणालेले आहेत.

Updated: May 3, 2022 22:07 IST
Follow Us
  • “आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रकत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल” (सर्व छायाचित्र - संग्रहीत)
    1/15

    “आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रकत्न केला, तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल” (सर्व छायाचित्र – संग्रहीत)

  • 2/15

    “देशातल्या तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की उद्या ४ मे रोजी जिथे जिथे यांचे भोंगे अजान, बांग देतील, तिथे तिथे आपण भोंग्यांवर हनुमान चालीसा लावावी.”

  • 3/15

    “भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. आम्हाला देशातली शांतता बिघडवायची नाही.”

  • 4/15

    “देशात आम्हाला दंगलीही नकोत परंतु आपण धर्मासाठी हट्टीपणा करणं सोडणार नसाल, तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही.”

  • 5/15

    “हिंदू सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व नावांखाली अटी घालायच्या पण मशिगदींना कोणत्याही अटी नाहीत. संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसतं?” असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे.

  • 6/15

    राज ठाकरे म्हणतात “हिंदूंनो त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.”

  • 7/15

    “सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.”

  • 8/15

    “मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांच्या त्रासाबद्दल तक्रार करावी. रोज करावी”

  • 9/15

    “हा विषय एका दिवसात सुटणारा नाही याचीही मानसिक तयारी ठेवावी.”

  • 10/15

    देशातील सर्व राज्यकर्त्यांना हे भोंगे बंद पाडण्यास भाग पाडावे. प्रत्येक राज्यातल्या नागरिकांनी आपल्या सत्ताधारी राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे.”

  • 11/15

    “हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बैगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे”

  • 12/15

    “कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे की या देशात, या राज्यात कायद्याचं राज्य आहे हे त्यांनी दाखवून द्यावं.

  • 13/15

    अनधिकृत मशिदी, अनधिकृत भोंगे, रस्त्यांवर होणारे नमाज पठण यांना जबाबदार असलेल्या लोकांना आपला पोलिसी खाक्या दाखवावा.”

  • 14/15

    “देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबण सरकारला शक्य होईल. हे सुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे.”

  • 15/15

    “माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारून एकत्र या. आता नाही तर कधीच नाही”

TOPICS
मनसेMNSराज ठाकरेRaj Thackeray

Web Title: Raj thackeray upholds ultimatum regarding loudspeakers on mosques msr

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.