• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of leopard found in family in malegaon nashik care as cat pbs

Photos : नाशिकमध्ये मांजरीचे पिल्लू समजून चिमुकल्यांनी खेळवले बिबट्याचे बछडे, अन् ५ दिवसांनी…

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा सांभाळ केला.

May 13, 2022 22:27 IST
Follow Us
  • नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा सांभाळ केला.
    1/14

    नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात मोरदर शिवारात ठाकरे कुटुंबातील चिमुकल्यांनी बिबट्याच्या बछड्याला मांजरीचे पिल्लू समजून तब्बल ५ दिवस त्याच्यासोबत खेळले, त्याचा सांभाळ केला.

  • 2/14

    ५ दिवसांनंतर हे मांजरीचे पिल्लू नसून बिबट्याचं बछडं असल्याचं लक्षात आलं. यानंतर या कुटुंबाने वनविभागाला संपर्क साधून बिबट्याच्या बछड्याला त्यांच्या ताब्यात दिलं.

  • 3/14

    मादीपासून दुरावलेले अडीच महिन्याचे बिबट्याचे बछडे जंगलात सैरभैर फिरत होतं. फिरत फिरत हे बछडं मानवी वसाहतीजवळ आलं. त्यावेळी कृष्णा ठाकरे यांच्या कुटुंबातील चिमुकल्यांना हे बछडं दिसलं.

  • 4/14

    या चिमुकल्यांनी मांजरीचे पिल्लू समजून बिबट्याच्या बछड्याला घरी आणले. तसेच बछड्याला दुध पाजून, खाऊ घालत त्याचं संगोपन व संरक्षण केलं. ५ दिवसानंतर हे बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात आले.

  • 5/14

    अनेक दिवस कडाक्याच्या उन्हात फिरल्याने बिबट्याच्या बछड्याला त्वचा रोग झाला. तसेच अपेक्षित अन्न पाणी न मिळाल्याने बछड्याची प्रकृती खालावली.

  • 6/14

    बिबट्याचे बछडे असल्याचे लक्षात येताच ठाकरे कुटुंबियांनी बछडे वन विभागाच्या ताब्यात सुपुर्द केले. त्यावेळी कुटुंबातील चिमुकल्या सदस्यांना गहीवरुन आलं.

  • 7/14

    काटवन परिसरातील मोरदर शिवारात जंगल आहे. या जंगलात कोल्हे, हरीण, बिबट्यांसह अन्य जंगली प्राण्यांचा वावर आहे.

  • 8/14

    खाकुर्डी येथील कृष्णा ठाकरे यांचे कुटुंबीय मोरदर शिवारात वास्तव्याला आहे.

  • 9/14

    शेताजवळ या कुटुंबातील मुलांना मांजरीच्या पिलासारखे गोंडस वेगळ्या रंगाचे बछडे दिसले.

  • 10/14

    त्यांनी या बछड्याला घरी आणले. हे १८ ते २० जणांचे एकत्र कुटुंब आहे. या कुटुंबातील तिर्थ, वेदांत, दक्ष, अथर्व व दोन वर्षाची तनुजा या मुलांना या बछड्याचा चांगलाच लळा लागला होता.

  • 11/14

    सोमवारी (९ मे) वन विभागाने या बछड्याला आणल्यानंतर पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी त्याच्या त्वचारोगावर उपचार केले.

  • 12/14

    बछडे वन विभागाकडे आल्यानंतर अन्न खात नव्हते. त्वचारोगासोबतच त्याच्यावर भूक न लागण्याचे औषधोपचारही करण्यात आले.

  • 13/14

    तीन दिवसानंतर बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर मालेगाव वन विभागाने बछड्याला नाशिक वनविभागाकडे सोपविले.

  • 14/14

    नाशिक येथे काही दिवस संगोपन करुन या बछड्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल, अशी माहिती मालेगाव वनाधिकारी वैभव हिरे यांनी दिली.

TOPICS
जंगलForestनाशिकNashikबिबट्याLeopard

Web Title: Photos of leopard found in family in malegaon nashik care as cat pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.