-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हिलियन इमारत, अद्यावत सिंथेटिक ट्रॅक व इनडोअर हॉलचं उद्घाटन केलं.
-
यावेळी अजित पवार यांनी क्रीडा संकुलातील रायफल शुटिंग विभागात स्वतः शुटिंग केली. तसेच त्या विभागाची अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतली.
-
विशेष म्हणजे अजित पवार यांनी एकाग्र होऊन अधिकाऱ्यांच्या सूचना ऐकल्या आणि शुटिंग केली.
-
उदय सामंत यांनी देखील रायफल शुटिंगचा आनंद घेतला.
-
यावेळी अजित पवार यांनी लेझर रायफलची माहिती घेत ही रायफल देखील चालवून पाहिली.
-
एकूणच अजित पवार यांनी विद्यापीठातील या क्रीडा संकुलाची पाहणी करत सखोल माहिती घेतली.
-
तसेच ठिकठिकाणी अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्या.
-
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अजित पवार यांनी फुटबॉल खेळण्याचाही आनंद घेतला.
-
अजित पवार यांनी फुटबॉलला किक मारत खेळण्याचा प्रयत्न केला. तसेच खेळाडूंना चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. (सर्व फोटो सौजन्य – सागर कासार/ लोकसत्ता प्रतिनिधी)
Photos : स्वतः बंदूक चालवत शुटिंग, फुटबॉलचाही घेतला आनंद, अजित पवारांचे पुणे विद्यापीठातील खास फोटो…
अजित पवार यांनी क्रीडा संकुलातील रायफल शुटिंग विभागात स्वतः शुटिंग केली. तसेच त्या विभागाची अधिकाऱ्यांकडून माहिती देखील घेतली.
Web Title: Photos of ajit pawar visit to kushaba jadhav sport complex in pune pbs