-
शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर विक्रमी संख्येने पर्यटकांनी कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाला (Rajiv Gandhi Zoological Park) रविवारी (५ जून) भेट दिली. (सर्व फोटो सौजन्य: पवन खेंगरे)
-
शहरात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर १४ मार्च रोजी उद्याने आणि प्राणीसंग्रहालय खुले करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. प्राणीसंग्रहालय खुले करण्यात आल्यानंतर पहिल्या दिवशी तब्बल १४ हजार पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती.
-
शाळांना सुटी लागल्यानंतर लहान मुलासंह आबाल वृद्धांची गर्दी प्राणीसंग्रहालयात सुरू झाली. १५ मे रोजी २२ हजार १८२ पर्यटकांनी प्राणी संग्रहालायाला भेट दिली होती. त्यानंतर गेल्या रविवारी २९ मे रोजी २० हजाराहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली होती.
-
त्यानंतर उच्चांक रविवारी (५ जून) झाला. रविवारी २४ हजाराहून अधिक पर्यटकांनी प्राणीसंग्रहालयाला भेट दिली, अशी माहिती कात्रज प्राणीसंग्रहालयाचे प्रमुख डॉ. राजकुमार जाधव यांनी दिली. रविवारी दुपारपर्यंत पर्यटकांच्या रांगा प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारा समोर लागल्या होत्या.
-
करोना संसर्गामुळे दोन वर्षे प्राणीसंग्रहालाय बंद होते. या प्राणीसंग्रहालयात सिंह, शेकरू, वाघाटी मांजर आदी नवे प्राणी आहेत.
-
वाघ, बिबट्या, हरीण, गवा, लांडगा, कोल्हा, अस्वल, हत्ती बरोबरच चौशिंगा आणि तरस आदी प्राणी पर्यटकांना या प्राणीसंग्रहालयात पहाता येतात. येत्या काही काळात झेब्रा आणि अन्य काही प्राणी प्राणीसंग्रहायायात आणण्याचे विचाराधीन आहे.
-
प्राणीसंग्रहालाय बंद होते, त्या कालावधीत नव्या प्राण्यांसाठी खंदक तयार करण्यात आले आहेत. प्राणीसंग्रहालयात विविध विकासकामेही प्रगतीपथावर असून पर्यटकांची संख्या वाढल्याने प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनाही हुरुप आलाय.
-
कात्रज येथील प्राणीसंग्रहालय आणि सर्पोद्यान देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे. त्यादृष्टीने महापालिकेच्या माध्यमातून प्राणी हस्तांतरण प्रक्रिया प्रशासनाकडून राबविली जात आहे.
-
वाघांबरोबरच शेकरू, जंगल कॅट, लेपरड कॅट आदी प्राणी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.
Photos: पुण्यातील ‘या’ ठिकाणाला काल २४ हजार जणांनी दिली भेट; चिमुकल्यांचीही मोठ्या संख्येनं हजेरी, कारण ठरलं रविवारीच सुट्टी
This Place in Pune host record number of visitors on 5th june 2022: एवढ्या मोठ्या उपस्थितीमुळे एक नवा विक्रम नोंदवला गेलाय
Web Title: Rajiv gandhi zoological park pune host record number of visitors on 5th june 2022 pune print news scsg