Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shubhada sahasrabudhe painting exhibition pune print team scsg

चारकोल पेपरवरील भन्नाट चित्रं पाहण्याची पुणेकरांना संधी; अमेरिकेत राहून पुणेकर महिलेने चितारलेल्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन

१२० व्यक्तिचित्रे पुणेकरांना पाहता येणार आहेत, अशी माहिती शुभदा सहस्रबुद्धे यांनी दिली.

June 8, 2022 16:14 IST
Follow Us
  • shubhada sahasrabudhe painting exhibition in pune
    1/6

    टाळेबंदीच्या काळात अमेरिकेमध्ये वास्तव्यास असताना चित्रकार शुभदा सहस्रबुद्धे यांनी कलेच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा जागृत केली. ‘कार्त दे विझीत’ या त्यांनी चितारलेल्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन शुक्रवारपासून पुण्यात भरविण्यात येत आहे.

  • भांडारकर रस्त्यावरील आर्ट टू डे आर्ट गॅलरी येथे रविवरपर्यंत (१२ जून) सकाळी अकरा ते सायंकाळी सायंकाळी सात या वेळात हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
  • 2/6

    चारकोल पेपरवरील चित्रांच्या या प्रदर्शनात स्वातंत्र्यवीर सावरकर, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, इरफान खान, सचिन तेंडूलकर, कपिल देव, मधुबाला, श्रीदेवी यांच्या चित्रांसह १२० व्यक्तिचित्रे पुणेकरांना पाहता येणार आहेत, अशी माहिती शुभदा सहस्रबुद्धे यांनी दिली.

  • 3/6

    गेली २३ वर्षे अमेरिकेमध्ये असलेल्या सहस्रबुद्धे सध्या पद्मावती येथे वास्त्यव्याला आहेत. अमेरिकेमध्ये असताना त्यांनी ही सर्व चित्रे साकारली आहेत.

  • 4/6

    सहस्रबुद्धे म्हणाल्या, ‘करोना काळात ‘स्केच अ डे’ या संकल्पनेतून सलग १४० दिवस विविध देशातील प्रभावी व्यक्तीमत्त्वाचे चित्र मी काढले. या संकल्पनेतून केवळ सकारात्मकतेचा प्रसार झाला आणि जगभरातील लोकांशी मी जोडले गेले.”

  • 5/6

    “प्रत्येक चित्रासाठी अडीच तासांची मुदत देत मी स्वत:ला आव्हान दिले. डोळे, नाक, कान, ओठ ही प्रत्येकाची वैशिष्ट्ये सारखीच असतात. परंतु, बारीकसारीक बदलामुळे चेहऱ्याची ओळख पूर्णपणे बदलते. माझ्यासाठी चेहऱ्यावरचे भाव चित्रामध्ये आणण्याला सर्वोच्च प्राधान्य होते,‘ असंही त्या म्हणाल्या.

TOPICS
पुणेPuneपुणे न्यूजPune News

Web Title: Shubhada sahasrabudhe painting exhibition pune print team scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.