-
अमृता फडणवीस यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली. (छायाचित्र सौजन्य : पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)
-
तसेच इतर व्यवसायांप्रमाणे देहविक्री व्यवसायाला सन्मान मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. (छायाचित्र सौजन्य : पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)
-
त्या शनिवारी (११ जून) दुपारी १ वाजता पुण्यातील बुधवार पेठेत महिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर व मुलींसाठी सुकन्या कार्डचे वाटप कार्यक्रमात आल्या होत्या. (छायाचित्र सौजन्य : पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)
-
अमृता फडणवीस म्हणाल्या, “मी सरकारला असंच सांगेन की जसा इतर व्यवसायांना सन्मान असतो, त्याप्रमाणे देहविक्री व्यवसायाला देखील आदर मिळाला पाहिजे. त्याला एक व्यवसाय म्हणून स्विकारलं पाहिजे.” (छायाचित्र सौजन्य : पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)
-
“जर्मनीसारख्या देशांमध्ये देहविक्री व्यवसाय करणाऱ्यांचं आदरणीय स्थान आहे. देहविक्री व्यवसाय करणारे या देशांमध्ये कर देखील भरतात. तेच स्थान आपण सर्वजण एकत्र आलो तर भारतात देखील मिळू शकतं. मी या निर्णयाच्या पाठीशी आहे,” असं अमृता फडणवीसांनी नमूद केलं. (छायाचित्र सौजन्य : पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)
-
“कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तंदुरुस्त राहा. आम्ही बुधवार पेठेतील तुमच्या भागात हवं तिथं योगा क्लासेस उपलब्ध करून देऊ,” असंही आश्वासन अमृता फडणवीसांनी दिलं. (छायाचित्र सौजन्य : पवन खेंगरे, एक्स्प्रेस फोटो)
Photos : “देहविक्रीला मान्यतेची मागणी ते बुधवार पेठेत योग शिबीर”, अमृता फडणवीसांची पुण्यातील वक्तव्यं
अमृता फडणवीस यांनी भारतात देखील देहविक्री व्यवसायाला ‘प्रोफेशन’ म्हणून मान्यता देण्याची सरकारकडे मागणी केली.
Web Title: Photos of amruta fadnavis participating in program of budhwar peth in pune pbs