• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. agnipath scheme protests turn violent trains and vehicles torched dpj

Photos : ‘अग्निपथ’ योजनेचा निषेध; देशभरात आंदोलकांकडून जाळपोळ, पाहा हिंसाचाराचे फोटो

अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेला होणारा विरोध आणखी तीव्र होताना दिसत आहे.

June 17, 2022 21:41 IST
Follow Us
  • केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येत आहे. देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शनांना हिंसाचाराचे वळण लागले आहे.
    1/16

    केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यात येत आहे. देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. या निदर्शनांना हिंसाचाराचे वळण लागले आहे.

  • 2/16

    उत्तर प्रदेशसह बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ करण्यात आली आहे. आक्रमक झालेल्या नागरीकांनी रेल्वेच्या काचा फोडत डब्यांना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत.

  • 3/16

    या घटनांमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील २२ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर ५ गाड्या थांबण्यात आल्या आहेत.

  • 4/16

    अग्निपथ हे संरक्षण दलांसाठी केंद्र सरकारचे नवीन भरती धोरण आहे ज्या अंतर्गत १७.५ वर्षे ते २१ वर्षे वयोगटातील सुमारे ४५,००० लोकांना चार वर्षांच्या कार्यकाळासाठी सेवेत समाविष्ट केले जाईल.

  • 5/16

    सैनिकांच्या भरतीसाठी भारतीय लष्कराच्या नवीन अग्निपथ योजनेच्या विरोधात गुरुवारी पलवलमध्ये हिंसक वळण लागले योजना मागे घेण्याची मागणी करणारे शेकडो तरुण रस्त्यावर उतरले आणि पलवलमधील उपायुक्तांच्या निवासस्थानाचा घेराव केला. (एक्स्प्रेस फोटो)

  • 6/16

    पलवलमधील उपायुक्तांच्या निवासस्थानावर आंदोलकांनी दगडफेक करत घेराव घातला. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या दगडफेकीत अनेक पोलिसांना दुखापत झाली असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे. (एक्स्प्रेस फोटो)

  • 7/16

    पलवलमध्ये आंदोलकांनी रस्ते अडवून दगडफेक सुरू केली आणि काही वाहनांची जाळपोळ केली. (एक्स्प्रेस फोटो)

  • 8/16

    दिल्लीच्या नांगलोई रेल्वे स्टेशनवर निदर्शने करण्यात आली. अग्निपथ योजनेचा निर्णय मागे घेण्याची मागणी आंदोलकांनी अनेक गाड्या थांबवल्या. (श्रेय: IANS फोटो)

  • 9/16

    बिहारमधील बक्सरमध्ये ‘अग्निपथ’ योजनेला विरोध करण्यासाठी तरुण रेल्वे रुळांवर बसले आहेत. (फोटो:पीटीआय)

  • 10/16

    झारखंडमधील रांची येथील सैन्य भरती कार्यालयासमोर युवक निदर्शने करत आहेत. (फोटो: पीटीआय)

  • 11/16

    रांची, झारखंडमध्ये अग्निपथ योजनेला विरोध करणारे तरुण. दरम्यान, आंदोलकांना शांत करण्याच्या प्रयत्नात, केंद्र सरकारने भर्ती योजनेवर उपस्थित केलेल्या चिंतेचे निराकरण करणारे “मिथ्स विरुद्ध तथ्य” दस्तऐवज जारी केले. (फोटो:पीटीआय)

  • 12/16

    बिहारच्या जेहानाबादमध्ये सैन्य भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजनेला विरोध करत निदर्शकांनी रेल्वे अडवली. आंदोलकांनी पूर्वीची भरती प्रणाली पुनर्स्थापित करण्याची मागणी केली आहे. (फोटो: रॉयटर्स)

  • 13/16

    बिहारमधील जेहानाबादमध्ये नवीन सैन्य भरती योजनेच्या निषेधार्थ लोक रस्त्यावर टायर जाळतात. (फोटो: रॉयटर्स)

  • 14/16

    निदर्शक बिहारमधील मुंगेर येथे लष्कराच्या नवीन नोकरी योजनेच्या निषेधार्थ पुश-अप करत आहेत. (फोटो: रॉयटर्स)

  • 15/16

    मध्य प्रदेशातील बिर्लानगर रेल्वे स्थानकाची तोडफोड करण्यात आली. बिहार, हरियाणा, नवी दिल्ली, जम्मू आणि झारखंडच्या अनेक भागांमध्ये इच्छुकांनी रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत केल्याने सशस्त्र दलाच्या नवीन भरती योजनेच्या विरोधात झालेल्या निदर्शनांना गुरुवारी हिंसक वळण लागले. (स्क्रीनग्रॅब)

  • 16/16

    पलवलमध्ये आंदोलकांनी कार उलटवली. केंद्राच्या नवीन योजनेला विरोध झाल्यानंतर हरियाणाच्या गृह विभागाने पलवलमध्ये इंटरनेट सुविधा बंद केली. (एक्स्प्रेस फोटो)

TOPICS
अग्निपथ योजनाAgneepath SchemeआंदोलनProtestमराठी बातम्याMarathi News

Web Title: Agnipath scheme protests turn violent trains and vehicles torched dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.