• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. photos of sant tukaram maharaj temple dehu pune amid palakhi prasthan pbs

Photos : देहूत ३२९ दिंड्यांसह मोठ्या प्रमाणात वारकरी येणार, संत तुकोबा पालखी प्रस्थानाच्या तयारीचे खास फोटो…

दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

June 19, 2022 20:46 IST
Follow Us
  • दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. (फोटो सौजन्य - राजेश स्टिफन)
    1/18

    दोन वर्षानंतर वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकोबांचा पालखी सोहळा पार पडणार आहे. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 2/18

    देहूत ३२९ दिंड्या दाखल होणार आहेत. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 3/18

    त्यामुळे मोठ्या संख्येने वारकरी देहूत येतील, असं विश्वस्त संजय महाराज मोरे व माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 4/18

    पालखी प्रस्थान होताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तुकोबांच्या पादुकांचे पूजन होईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 5/18

    त्यानंतर दुपारी ठीक दोन वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 6/18

    गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पार पडत होता. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 7/18

    एसटीमधून महत्त्वाच्या व्यक्तींसोबत पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असे. परंतु, यावर्षी करोना संख्या आटोक्यात असून कोणतेही निर्बंध नाहीत. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 8/18

    त्यामुळं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी देहूत दाखल होत आहेत. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 9/18

    दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा होत असल्याने वारकरी मोठ्या संख्येने दाखल होतील, असं विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी सांगितलं. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 10/18

    संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा २० जून २०२२ रोजी होईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 11/18

    २० जूनला पहाटे ५ वाचता संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात श्री विठ्ठल-रुखमाई महापूजा होईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 12/18

    यानंतर पहाटे ६ वाजता वैकुंठस्थान श्री संत तुकाराम महाराज पूजा करण्यात येईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 13/18

    सकाळी ७ वाजता संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज वारकरी यांच्या हस्ते तापोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा होईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 14/18

    सकाळी १० ते १२ रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त काल्याचे कीर्तन होईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 15/18

    सकाळी ९ ते ११ इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन होईल. (फोटो सौजन्य – राजेश स्टिफन)

  • 16/18

    दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी पालखी प्रस्थान करेन. (फोटो सौजन्य – कृष्णा पांचाळ)

  • 17/18

    सायंकाळी ५ वाजता पालखी प्रदक्षिणा होईल. (फोटो सौजन्य – कृष्णा पांचाळ)

  • 18/18

    सायंकाळी ६.३० वाजता इनामदार वाड्यात पालखी मुक्कामी जाईल. तेथेच मुख्य आरती होईल. (फोटो सौजन्य – कृष्णा पांचाळ)

TOPICS
आषाढी एकादशी २०२४Ashadhi Ekadashi 2024आषाढी वारी २०२५Ashadhi Wari २०२५पुणेPune

Web Title: Photos of sant tukaram maharaj temple dehu pune amid palakhi prasthan pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.