• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra political crisis bjp devendra fadnavis administration ias officer information photos sdn

Photos: फडणवीसच नाही ‘ते’ सुद्धा पुन्हा येतील; ‘या’ सहा दमदार प्रशासकीय अधिकाऱ्यांचं कमबॅक जवळजवळ निश्चित

महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर अशाच काही अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी मिळते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

June 30, 2022 15:39 IST
Follow Us
  • Devendra Fadnavis BJP
    1/13

    Maharashtra Political Crisis: सरकार बदलले की त्या सरकारचा प्रशासकीय चेहराही बदलतो.

  • 2/13

    नेतृत्वाच्या आवडीनुसार काही प्रशासकीय अधिकारी महत्त्वाच्या पदांवर येतात तर काही अधिकारी थोडे बाजूला पडतात.

  • 3/13

    महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यावर अशाच काही अधिकाऱ्यांना कोणती जबाबदारी मिळते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

  • 4/13

    भूषण गगराणी – सध्या नगर विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेले भूषण गगराणी हे मागील फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर भूषण गगराणी यांची नियुक्ती मुख्यमंत्री कार्यालयात होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील फडणवीस सरकारमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी यांचे स्थान गगराणी यांना मिळू शकते अशी चर्चा आहे.

  • 5/13

    अश्विनी भिडे – मागील फडणवीस सरकारच्या काळात अश्विनी भिडे या मेट्रो ३ प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.

  • 6/13

    सध्या त्या मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकारमध्ये अश्विनी भिडे यांच्यावर मोठी जबाबदारी येऊ शकते.

  • 7/13

    प्रवीण दराडे – प्रवीण दराडे हे मागील फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अशा महत्त्वाच्या ठिकाणी काम करत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते बाजूला पडले. आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर प्रवीण दराडे पुन्हा एकदा महत्त्वाच्या पदावर दिसतील अशी चर्चा आहे.

  • 8/13

    संजीव जयस्वाल -मागील फडणवीस सरकारच्या काळात संजीव जयस्वाल हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांचे जवळचे अधिकारी अशी त्यांची ओळख झाली होती. त्यामुळे आता फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यावर संजीव जयस्वाल यांच्याकडे मोठी जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

  • 9/13

    मनीषा म्हैसकर – मागील फडणवीस सरकारच्या काळात मनीषा म्हैसकर या नगर विकास विभागात कार्यरत होत्या. महाविकास आघाडी सरकार आल्यावरही त्यांचे महत्त्व कायम राहिले.

  • 10/13

    आदित्य ठाकरे यांच्याकडील पर्यावरण आणि राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली. आता नव्या फडणवीस सरकारमध्ये मनीषा म्हैसकर यांच्यावर काय जबाबदारी येते याबाबत नोकरशाहीत तर्कवितर्क सुरू आहेत.

  • 11/13

    दीपक कपूर – मागील फडणवीस सरकारच्या काळात दीपक कपूर हे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.

  • 12/13

    सध्या ते महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि माहिती व जनसंपर्क संचालनालयाचे महासंचालक म्हणून काम करत आहेत. नव्या फडणवीस सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती होऊ शकते.

  • 13/13

    सर्व फोटो सौजन्य : ट्विटर (हेही पाहा : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; पण सोशल मीडियावर चर्चा मात्र अमृता फडणवीसांची)

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPमहाराष्ट्रMaharashtra

Web Title: Maharashtra political crisis bjp devendra fadnavis administration ias officer information photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.