
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजपाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा आज (३० जून) गुरुवारी केला जाईल.

देवेंद्र फडणवीस पुढील दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.

विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापेक्षा उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला.

पण सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीची.

काही कामानिमित्त अमृता फडणवीस लंडनला गेल्या आहेत.

लंडनच्या स्वामीनारायण मंदिरात जाऊन अमृता यांनी दर्शन घेतले.

मंदिर परिसरातील काही फोटो अमृता यांनी सोशल मीडियावरवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृता यांनी गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

गायिका म्हणून अमृता फडणवीस यांची स्वतंत्र ओळख आहे.

अमृता यांची गाणी सोशल मीडियावर आणि यूट्यूबवर तुफान व्हायरल होतात.

(सर्व फोटो सौजन्य : अमृता फडणवीस / ट्विटर)