• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • एकनाथ खडसे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena mla santosh bangar joins cm eknath shinde group his old speech video viral photos kak

Photos : शिवसेनेतील बंडखोरीनंतर भाषणात रडले होते आमदार संतोष बांगर; मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाल्याने आश्चर्याचा धक्का

Shivsena MLS Santosh Bangar Join Eknath Shinde- BJP : आमदार संतोष बागर यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते.

Updated: July 4, 2022 12:33 IST
Follow Us
  • Shivsena mla santosh bangar joins cm eknath shinde camp
    1/15

    राज्यातील विधीमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. शिंदे-फडणवीस सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावे लागणार आहे.

  • 2/15

    शिवसेनेचे ३९ आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात असल्याचा दावा त्यांनी केला होता.

  • 3/15

    आता शिवसेनेचा आणखी एक आमदार शिंदे गटात गेल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. (फोटो : ANI)

  • 4/15

    शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 5/15

    संतोष बांगर हे कालपर्यंत शिवसेनेसोबत एकनिष्ठ होते. विशेष म्हणजे त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन साळवी यांच्या बाजूने मतदान केले होते

  • 6/15

    आज संतोष बांगर यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि समर्थक आमदारांसोबत विधानभवनात प्रवेश केल्याने सगळेच आश्चर्यचकीत झाले. (फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

  • 7/15

    शिवसेनेतील बंडखोरीनंतर हिंगोलीत काढण्यात आलेल्या मोर्च्यात संतोष बांगर सहभागी झाले होते.

  • 8/15

    बंडखोरा आमदारांविरोधात भूमिका घेतल्यामुळे बांगर यांचे कौतुकही झाले होते. याशिवाय त्यांची मिरवणूकही काढण्यात आली होती.

  • 9/15

    या मिरवणूकीतील त्यांच्या भाषणाची तुफान चर्चा रंगली होती. यावेळी संतोष बांगर रडले होते.

  • 10/15

    “तुम्ही पुन्हा पक्षात या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्हाला माफ करतील “,असे आवाहन त्यांनी शिंदे समर्थक आमदारांना केले होते.

  • 11/15

    “निवडणुकीत विजयी झाल्यानंतर माझी एवढी मोठी मिरवणूक काढली नव्हती, ती आज काढण्यात आली. शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठिशी कायम असणार “, असं ते म्हणाले होते.

  • 12/15

    संतोष बांगर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटात सामील झाल्यानंतर त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.

  • 13/15

    बांगर हे शिंदे गटात गेल्याने शिंदे गटातील आमदारांची संख्या ४० वर पोहोचली आहे. तर उद्धव ठाकरे गटातील आमदारांची संख्या १५ वर आली आहे.

  • 14/15

    (सर्व फोटो : संतोष बांगर/ इन्स्टाग्राम)

  • 15/15

    (हेही पाहा : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना नेमका किती पगार मिळतो?; कुठल्या सुविधांसाठी ते पात्र असतात?)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeमहाराष्ट्र पॉलिटिक्सMaharashtra PoliticsशिवसेनाShiv Sena

Web Title: Shivsena mla santosh bangar joins cm eknath shinde group his old speech video viral photos kak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.