-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी देवघर विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. देवघर ते कोलकाता अशी विमानसेवा सध्या सुरु होणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवाही सुरु करण्यात येणार आहे.
-
झारखंडमधील रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळानंतर देवघर विमानतळ हे राज्यातील दुसरे विमानतळ असेल.
-
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने ४०० कोटी रुपये खर्चून विमानतळ बांधले आहे.
-
देवघर विमानतळ ६५४ एकरमध्ये पसरलेले आहे. विमानतळावर २५०० मीटर लांब धावपट्टी आहे, एअरबस A३२० आणि बोईंग ७३७ हे दोन्ही विमाने या धावपट्टीवर उतरु शकतात
-
टर्मिनल बिल्डिंगमध्ये सहा चेक-इन काउंटर आणि दोन आगमन काऊंटर आहेत,
-
टर्मिनल इमारतीची रचना बैद्यनाथ मंदिराच्या संरचनेवरून प्रेरित आहे आणि त्यात आदिवासी कला, हस्तकला आणि स्थानिक भित्तीचित्रे आहेत.
-
12 जुलै रोजी देवघर विमानतळाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बाबा बैद्यनाथ धाम येथे प्रार्थना करणार आहेत.
-
४,००० चौरस मीटरची टर्मिनल इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीत प्रती तास २०० प्रवासी ये-जा करु शकातात
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मे २०१८ रोजी झारखंडमधील विमानतळाच्या विकासासाठी पायाभरणी केली होती.
Photos : ४०० कोटी खर्च करुन झारखंडमधील देवघर विमानतळाची उभारणी; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार उद्धाटन
झारखंडमधील रांचीच्या बिरसा मुंडा विमानतळानंतर देवघर विमानतळ हे राज्यातील दुसरे विमानतळ असेल.
Web Title: Pm narendra modi will inaugurate deoghar airport on 12 july dpj