-
केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
-
किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असं केसरकर म्हणाले.
-
सावंतवाडी मतदारसंघाच्या शासकीय आढावा बैठकीला आले होते. या ठिकाणी पोलीस छावणीचे रूप आले होते.
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहोरात्र काम करणारे नेते आहेत तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ही जोडी राज्याला गतवैभव निर्माण करून देणार आहे, असंही केसरकर म्हणाले.
-
त्यामुळे करोनाच्या काळामध्ये महाराष्ट्र मागे पडला तो पुढे जाण्यासाठी आमचा प्रयत्न राहील असे देखील आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले.
-
खासदार विनायक राऊत स्वत:ला मुख्यमंत्री समजत होते असा टोला केसरकरांनी हाणला.
-
“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण खासदार विनायक राऊत स्वत: मुख्यमंत्री समजत होते,” असं केसरकर म्हणाले.
-
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी विकासाच्या मुद्द्यावर एकमत करायला मी कधीही तयार आहे, असंही केसरकर यांनी म्हटलं.
-
मात्र हे होण्यासाठी आधी नारायण राणे, त्यांच्या सुपुत्रांनी उद्धव ठाकरे, मातोश्रीवर बोलण्याचे टाळले पाहिजे, असं स्पष्ट मत केसरकरांनी व्यक्त केलं.
-
राणे यांच्याकडे रोजगार निर्माण करणारे मंत्रालय आहे त्याचा उपयोग त्यांनी करून घेतला पाहिजे, असंही केसरकर यांनी म्हटलं.
-
चौकडीने आमदार व खासदार यांना उद्धव ठाकरे यांच्या पासून दूर ठेवले त्यामुळे दिलदारपणे सर्वाना जवळ घेतले तर भविष्यात शिंदे गटाशी जुळवून घेतील, असे आम्हाला आजही वाटते, असंही केसरकर म्हणाले.
-
वडीलकीच्या भूमिकेत त्यांनी तसा निर्णय घ्यावा, असा शिवसैनिकांचा आग्रह आहे. त्यामुळे हा वाद कायम राहणार नाही, असेही सूतोवाच केसरकर यांनी केले.
-
बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईने हा चमत्कार घडेल असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला.
-
माझ्या विरोधात घोषणा देऊन विकास होणार नाही तुम्ही विकास करा पण माझ्या विरोधात घोषणा दिल्या तर मी गप्प राहणार नाही, असा इशाराही आमदार केसरकर यांनी दिला.
Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”
“चौकडीने आमदार व खासदार यांना उद्धव ठाकरे यांच्या पासून दूर ठेवले त्यामुळे दिलदारपणे सर्वाना जवळ घेतले तर भविष्यात शिंदे गटाशी जुळवून घेतील”
Web Title: Eknath shinde group spokesperson deepak kesarkar slams narayan rane vinayak raut scsg