-   युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे हे सध्या मुंबईत ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांना भेटत आहेत. 
-  या निष्ठा यात्रेत ते शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. 
-  आदित्य ठाकरे यांनी काल (दि. २० जुलै) रोजी वडाळा येथील शिवसेना शाखा क्र. १७८ ला भेट दिली. 
-  यावेळी भर पावसात आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. 
-  आदित्य ठाकरे यांनी नव्या सरकारवर टीका केली. 
-  “कोसळणाऱ्या पावसाला साक्ष ठेवत, हे नाटकी सरकारही कोसळणार…” असा विश्वास शिवसैनिकांना दिला. 
-  “शिवसेना सोडून जाणाऱ्या आमदारांमध्ये थोडी जरी लाज आणि हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन दाखवा” असे आव्हानही आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदारांना दिले. 
-  साताऱ्यात शरद पवार जेव्हा सभा घेत होते त्याचवेळी पाऊस पडू लागला. मात्र पवारांनी भाषण चालूच ठेवले होते. 
-  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. 
-  महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्तित्वात आले आहे. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. 
-  हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. 
-  बंडखोरी आणि राज्यात सत्तापालट झाल्यानंतर शिवसेनेकडून संघटना मजबूत करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. 
-  पक्षावरील पकड मजबूत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सक्रिय झाले आहेत. 
-  (सर्व फोटो सौजन्य : आदित्य ठाकरे / ट्विटर) 
Photos: पाऊस, सभा अन् समर्थक… आदित्य ठाकरेंच्या सभेने करुन दिली शरद पवारांच्या सभेची आठवण
या निष्ठा यात्रेत आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत.
Web Title: Shivsena mla yuva sena president aaditya thackeray speech in heavy rain mumbai during nishtha yatra on cm eknath shinde photos sdn