Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai painter manoj kumar sakale drawing painting of former president ramnath kovind prd

मराठमोळ्या चित्रकाराने साकारल्या रामनाथ कोविंद यांच्या पेंटिंग्ज, थेट राष्ट्रपतीभवनात लावल्या जाणार, पाहा खास फोटो

सकळे यांनी साकारलेल्या या पेटिंग्जमध्ये जिंवतपणा आहे. त्यांनी या पेटिंग्जमध्ये राष्ट्रपतीभवनाची भव्यतादेखील जशीच्या तशी रेखाटली आहे.

Updated: July 25, 2022 19:20 IST
Follow Us
  • रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला असून देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली.
    1/12

    रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपला असून देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज शपथ घेतली.

  • 2/12

    आपल्या कार्यकाळात कोविंद यांनी त्यांच्यावर संविधानाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या पेंटिंग्ज काढण्याची संधी मराठमोळे चित्रकार मनोजकुमार सकळे यांना मिळाली आहे.

  • 3/12

    सकळे यांनी साकारलेल्या रामनाथ कोविंद यांच्या पेंटिंग्ज राष्ट्रपती भवनात लावल्या जाणार आहेत. सकळे यांनी कोविंद यांच्या एकूण दोन पेंटिंग्ज साकारल्या असून तिसऱ्या पेंटिंगवर ते काम करत आहेत.

  • 4/12

    यातील पहिली पेंटिंग ३ बाय ४ फूट तर दुसरी ५ बाय ८ फूट आहे. .

  • 5/12

    सकळे यांनी तीन पैकी दोन पेंटिंग्ज पूर्ण केल्या आहेत. या सर्व पेंटिंग्ज कोविंद यांनी स्वत: पाहिल्या असून त्यांना या पेंटिंग्जमधील जिवंतपणा खूप आवडला आहे.

  • 6/12

    या पेंटिंग्ज साकारताना मनोजकुमार सकळे यांना कोविंद यांची देहयष्टी तसेच राष्ट्रपतीभवनाचा अभ्यास केला.

  • 7/12

    पेंटिंग साकारण्याआधी सकळे यांनी कोविंद यांचे काही फोटो काढले. तसेच त्यांनी रामनाथ कोविंद यांच्या आयुष्याचाही अभ्यास केला.

  • 8/12

    रामनाथ कोविंद यांचा व्यासंग आणि अभ्यास व्यापक असल्याचे समजल्यानंतर सकळे यांनी कोविंद यांची हातात पुस्तक असलेली एक पेंटिंग काढण्याचे ठरवले. राष्ट्रपती भवनाने सकळे यांची ही कल्पना मान्य केली.

  • 9/12

    सकळे यांनी साकारलेल्या या पेटिंग्जमध्ये जिंवतपणा आहे. त्यांनी या पेटिंग्जमध्ये राष्ट्रपतीभवनाची भव्यतादेखील जशीच्या तशी रेखाटली आहे.

  • 10/12

    देशाच्या १४ व्या राष्ट्रपतींच्या पेंटिंग काढण्याची संधी मिळाल्याबद्दल मनोजकुमार सकळे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  • 11/12

    मनोजकुमार सकळे आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद

  • 12/12

    नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरने यांनी सकळे यांची प्रोफाईल राष्ट्रपतीभवनाला पाठविली होती. त्यानंतर सकळे यांना कोविंद यांच्या पेंटिंग्ज काढण्याची संधी मिळाली. (फोटोमध्ये चित्रकार मनोजकुमार सकळे)

TOPICS
भारताचे राष्ट्रपतीPresiden o Indiaरामनाथ कोविंदRamnath Kovindराष्ट्रपतीPresident

Web Title: Mumbai painter manoj kumar sakale drawing painting of former president ramnath kovind prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.