रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४५ रोजी कानपूरजवळील एका छोट्याशा गावात झाला. कोविंद हे भारताचे १४ वे राष्ट्रपती असून त्यांनी २५ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपती पदाची सूत्रं हाती घेतली. त्यांनी कानपूर विद्यापीठातून कॉमर्सची पदवी आणि कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात मिळून सुमारे १६ वर्षे वकिली केली आहे.
राष्ट्रपती बनण्यापूर्वी त्यांनी इतरही अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. २०१५ ते २०१७ दरम्यान रामनाथ कोविंद यांनी बिहारचे राज्यपाल म्हणून कामकाज पाहिलं आहे.
तसेच एप्रिल १९९४ ते मार्च २००६ दरम्यान सलग १२ वर्षे ते राज्यसभेचे खासदार म्हणूनही निवडून आले होते. रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात स्वयंसेवक म्हणून देखील काम केलं असून त्यांनी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. Read More
Ram Nath Kovind Farewell: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासाठी निरोप समारंभासाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.