• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. shivsena sanjay raut predicts maharashtra government will fall cm eknath shinde answers sgy

महाराष्ट्र सरकार कोसळणार? सत्तांतर होणार?

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार येऊन २८ दिवस झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही

July 29, 2022 08:10 IST
Follow Us
  • महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार येऊन २८ दिवस झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरे करुनही निर्णय न झाल्याने टीका होत आहे. त्यातच बुधवारी दिल्ली दौऱ्यावर निघालेल्या एकनाथ शिंदेंचा दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चांना उधाण आलं. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सत्तांतर होईल असं भाकीत वर्तवलं आहे. यावर एकनाथ शिंदेनीही उत्तर दिलं आहे.
    1/12

    महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार येऊन २८ दिवस झाले तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौरे करुनही निर्णय न झाल्याने टीका होत आहे. त्यातच बुधवारी दिल्ली दौऱ्यावर निघालेल्या एकनाथ शिंदेंचा दौरा अचानक रद्द झाल्याने चर्चांना उधाण आलं. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सत्तांतर होईल असं भाकीत वर्तवलं आहे. यावर एकनाथ शिंदेनीही उत्तर दिलं आहे.

  • 2/12

    सुप्रीम कोर्टात संविधानाच्या आणि कायद्याच्या विरोधात कोणतेही न्यायमूर्ती निकाल देणार नाहीत, याची खात्री असल्याने १६ आमदार अपात्र ठरतील हे नक्की आहे असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  • 3/12

    “बचाव करण्यासाठी या आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं लागतं, पण यानंतर ते आपल्याला शिवसैनिक म्हणू शकणार नाहीत. दुसऱ्या पक्षात विलीन होण्यास किती आमदार मानसिकदृष्ट्या तयार आहेत याची आम्हाला कल्पना आहे. आमदार आमच्या संपर्कात आहेत,” असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

  • 4/12

    “भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही,” असं भाकीत संजय राऊतांनी वर्तवलं आहे.

  • 5/12

    संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुनही टीका केली. “राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा दिल्ली स्वारीवर येणार होते, मात्र अचानक रद्द झालं. गेल्या महिन्याभरातील ही त्यांची पाचवी दिल्ली भेट होती. म्हणजे अनेकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्षातून चारवेळाही दिल्लीला आलेले नाहीत, पण सध्याच्या मुख्यमंत्र्यांना एका महिन्यातच पाच वेळा यावं लागतं. याबद्दल महाराष्ट्राच्या मनात गोंधळ आहे,” असं संजय राऊत म्हणाले.

  • 6/12

    “शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना कधी दिल्लीला यावं लागलं नाही. शिवसेनेचं हायकमांड कायम मुंबईत राहिलं आणि आता मुंबईतच चर्चा होत नाही. दिल्लीतील लोक मुंबईत येऊन शिवसेनेशी चर्चा करत होते. युती करण्यासंदर्भात अमित शाहदेखील मातोश्रीवर आले होते. मित्रत्वाच्या नात्यातून या गोष्टी घडत होत्या. पाच वेळा मुख्यमंत्र्यांना यावं लागत असल्याने आता बहुतेक ते आपला मुक्काम दिल्लीत हलवतात का असंही वाटू लागलं आहे,” असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

  • 7/12

    “मंत्रिमंडळाची स्थापना अद्याप होऊ शकलेली नाही. एक महिना झाला तरी दोघांचंच कॅबिनेट बेकायदेशीरणे निर्णय घेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या एका महिन्यापासून खेळखंडोबा सुरु आहे. शिवसेनेतून बाहेर पडून काय मिळवलं आणि महाराष्ट्राला काय दिलं याचं आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

  • 8/12

    एकनाथ शिंदेंना याबद्दल विचारण्यात आलं असता ते टोला लगावत म्हणाले “ते स्वप्नं पाहत असतात, त्यांना स्वप्नातच राहू द्या”.

  • 9/12

    “राज्यामध्ये १६६ लोकांचं सरकार आहे. लोकसभेतही १२ खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिलं आहे. दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत असून सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.

  • 10/12

    पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “ओबीसी समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होतं, त्यामुळे मी तीन-चार वेळा दिल्लीला गेलो होतो. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ, वकील, वरिष्ठ विधिज्ञ यांच्या बैठका घेतल्या. त्यातून या राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सरकारने केलं आहे. याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले आहेत”.

  • 11/12

    पुढे बोलताना त्यांनी सांगितलं “ओबीसी समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होतं, त्यामुळे मी तीन-चार वेळा दिल्लीला गेलो होतो. मी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तज्ज्ञ, वकील, वरिष्ठ विधिज्ञ यांच्या बैठका घेतल्या. त्यातून या राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम सरकारने केलं आहे. याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचेही आभार मानले आहेत”.

  • 12/12

    “लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल. मी आणि फडणवीसांनी राज्याचा कारभार हाती घेतल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, पेट्रोल-डिझेल स्वस्त केलं, दुष्काळग्रस्त भागात पाणी वळण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतही अनेक निर्णय घेण्यात आले. राज्याच्या हिताचे अनेक प्रकल्प पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. सरकार अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. सरकाचं काम आम्ही कुठे थांबू दिलेलं नाही. जनतेच्या हितामध्ये कोणतीही बाधा येणार नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeशिवसेनाShiv Senaसंजय राऊतSanjay Raut

Web Title: Shivsena sanjay raut predicts maharashtra government will fall cm eknath shinde answers sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.