-
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी ‘हेराल्ड हाऊस’वर छापा टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ( ३ ऑगस्ट) यंग इंडियनच्या कार्यालयाला टाळे ठोकले. (Express photo by Premnath Pandey)
-
तसेच यंग इंडियनचे कार्यालय पूर्वपरवानगीशिवाय न उघडण्याचा आदेशही काढला. ईडीच्या या कारवाईनंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे ‘दहा जनपथ’ तसेच, शेजारी असलेल्या काँग्रेसच्या मुख्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. (Express photo by Premnath Pandey)
-
ईडीच्या याच कारवाईवर भाजपाने कठोर टीका केली आहे. हे सुडाचे राजकारण आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केली. (Express photo by Premnath Pandey)
-
तर येत्या ५ ऑगस्ट रोजी काँग्रेसतर्फे देशभरात महागाई, बेरोजगारी यांच्याविरोधात आंदोलन केले जाईल, अशी माहिती काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी दिली. (Express photo by Premnath Pandey)
-
तसेच आमच्यावर कितीजरी कारवाई केली तरी आमचा आवाज दाबला जाऊ शकत नाही. यांच्या पायाखालची जमीन हादरली आहे, अशी टीका अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. (PTI)
-
आम्ही घाबरणाऱ्यांमधले नाही. आम्ही नरेंद्र मोदींना घाबरत नाही. समजलं का? काही फरक पडणार नाही. देशाचं संरक्षण करणं, येथील लोकशाहीचं संरक्षण करणं देशातील ऐक्य जपणं हे माझं काम आहे आणि मी ते करत राहणार, असे म्हणत राहुल यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. (PTI)
-
या कारवाईनंतर राहुल गांधी यांनीदेखील टीका केली आहे. या देशात लोकशाहीविरोधात नरेंद्र मोदी, अमित शाह जे करत आहेत त्याविरोधात आम्ही उभे राहणार. त्यांनी काहीही केलं तरी आम्ही ठामपणे उभे राहणार. आम्हाला काही फरक पडत नाही, असे राहुल गांधी म्हणाले. (Twitter @INCIndia)
-
३ ऑगस्ट रोजी अभिषेक मनू सिंघवी, जयराम रमेश तसेच अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेतली. (Twitter @INCIndia)
ईडीच्या कारवाईनंतर काँग्रेसकडून ५ ऑगस्ट रोजी देशभरात आंदोलन; सोनिया गांधी निवासस्थान, काँग्रेस मुख्यालय परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मंगळवारी ‘हेराल्ड हाऊस’वर छापा टाकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ( ३ ऑगस्ट) यंग इंडियाच्या कार्यालयाला टाळे ठोकले.
Web Title: Congress criticises bjp over tightened security in front of congress headquarter and sonia gandhi house prd