-
महागाई, बेरोजगारी आणि जीएसटीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी शुक्रवारी दिल्लीत निदर्शने केली. (एक्स्प्रेस फोटो)
-
लखनौमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात निदर्शने केली. (एक्स्प्रेस फोटो विशाल श्रीवास्तव)
-
पंजाब काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी सेक्टर १५ चंदिगडमध्ये आंदोलन केले. (एक्स्प्रेस फोटो)
-
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाच्या खासदारांनी, काळे कपडे घालून केंद्र सरकारचा निषेध केला.(एक्स्प्रेस फोटो अमित मेहरा)
-
राजधानीत अनेक ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. (एक्स्प्रेस फोटो अमित मेहरा)
-
निदर्शनांदरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि सचिन पायलट यांना ताब्यात घेण्यात आले आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
निषेधापूर्वी, दिल्ली पोलिसांनी बुधवारी मोर्चाला परवानगी नाकारणारे पत्र पक्षाला पाठवले. संपूर्ण राजधानीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (एक्स्प्रेस फोटो)
-
आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांनी ‘मोदी है तो मेहेंगे है’ असे लिहिलेले पोस्टर हातात घेतले होते. हे छायाचित्र नवी दिल्लीतील एआयसीसी मुख्यालयाबाहेर काढण्यात आले आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
जंतर-मंतर वगळता संपूर्ण नवी दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. (एक्स्प्रेस फोटो)
-
राजस्थान काँग्रेसचे नेते आंदोलनात सामील होण्यासाठी एआयसीसीच्या मुख्यालयात पोहोचताच काँग्रेस कार्यकर्ते “सचिन पायलट जिंदाबाद” च्या घोषणा देत होते. (एक्स्प्रेस फोटो)
-
काँग्रेसचे राज्यसभा खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “आमचा लढा महागाई आणि वाढीव खर्चाविरुद्ध आहे” (एक्स्प्रेस फोटो)
-
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पक्षाचे नेते राहुल गांधीही उपस्थित होते. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)
-
काळे कपडे घालून आंदोलकांनी संसदेपासून राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला. (एक्स्प्रेस फोटो प्रवीण खन्ना)
-
शुक्रवारी लुधियानामधील फिरोजपूर रोडवर महागाईच्या विरोधात काँग्रेसने निदर्शने केली. (एक्स्प्रेस फोटो गुरमीत सिंग)
Photos : प्रियांका गांधींना फरफटत नेलं.. दिल्लीत १४४ कलम लागू.. पाहा काँग्रेसच्या महागाईविरोधातील देशव्यापी आंदोलनात नेमकं काय घडलं
देशातील बेरोजगारी आणि महागाईविरोधात काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. काँग्रेसतर्फे शुक्रवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले.
Web Title: Congress nationwide protests rahul gandhi priyanka gandhi aginest against unemployment and inflation in the country dpj