-
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर असून ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी २०१४ ते २०२२ या आठ वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रात ओबीसी हिताचे एकूण २२ निर्णय झाले, त्यातील २१ निर्णय हे मी मुख्यमंत्री असताना घेतले. आता सुद्धा ओबीसी हिताचे निर्णय घेणारे सरकार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आले आहे, आम्ही खंबीरपणे समाजाच्या पाठीशी उभे राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
-
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना आम्ही केली. शिक्षण, रोजगार, छात्रावास, आयएएस-आयपीएस प्रशिक्षण, विदेशात शिक्षण शिष्यवृत्ती अशा सर्वच बाबतीत निर्णय घेतले. मध्यंतरी ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले, तेव्हा सत्तेत आल्यास चार महिन्यात ओबीसी आरक्षण परत नाही मिळाले, तर राजकारण सोडून देईन, अशी घोषणा मी केली होती आणि आज आनंद आहे की ते आरक्षण आपण पुन्हा बहाल केले.
-
आज केंद्रात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ओबीसी हिताचे अनेक निर्णय झाले. स्वतः पंतप्रधान हे ओबीसी आहेत, केंद्रात ४० टक्के मंत्री ओबीसी आहेत. ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याचे काम झाले, राष्ट्रीय पातळीवर मेडिकल प्रवेशात ओबीसींना प्रथमच आरक्षण देण्याचा निर्णय झाला. आपले पक्ष वेगवेगळे असले तरी ओबीसी हितासाठी आपण सगळे एकत्रित काम करू आणि या मंचाचा कार्यकर्ता म्हणून मी माझे योगदान देत राहीन, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
-
“काही दिवसांपूर्वी ओबीसींच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हा मी नागपूरमध्ये म्हटलं होतं की मी सत्तेत आल्यानंतर चार महिन्यात ओबीसी आरक्षण पुन्हा मिळालं नाही, तर मी राजकीय संन्यास घेईन. मी ओबीसी आरक्षणासाठी राजकीय संन्यास घेईन म्हणणारा व्यक्ती आहे. मला ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाचा आनंद आहे. मला त्याचं कोणतंही श्रेय घ्यायचं नाही. सर्वांनी मिळून प्रयत्न केले आणि ओबीसींचं राजकीय आरक्षण पुन्हा आलं,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
-
आज विदर्भ, मराठवाडा, कोकणासाठी भावनिक भाषणे देऊन काय उपयोग, सत्तेत असताना तुम्ही काय केले, हे अधिक महत्त्वाचे असते. जनता भावनिक भाषणांना कधीच बळी पडत नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना काही नेत्यांना लगावला.
-
“माहिती असतानाही फक्त राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना अधिकार होते. त्याआधीही आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना हे अधिकार दिले होते. महाराष्ट्रात नव्हेत देशात ही पंरपरा आहे. सरकार जनतेचं असून, जनेतेचे मुख्यमंत्री आहे. जनताच महाराष्ट्रात निर्णय घेईल,” असं फडणवीस म्हणाले आहेत.
-
“कालच मुख्यमंत्र्यांनी विस्तार लवकर होईल असं स्पष्ट सांगितलं आहे. मी तर म्हणतो त्यापेक्षाही लवकर होईल. सुप्रीम कोर्टाने मंत्रीमंडळ विस्तार करु नका असं सांगितलेले नाही. सुनावणीचा आणि त्याचा काही संबंध नाही,” असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.
-
“अजित पवार विरोधी पक्षनेते असल्याने त्यांना बोलावंच लागेल. त्यांच्या काळातही ३०-३२ दिवस पाचच मंत्री होते. पण हे विसरुन त्यांना बोलावं लागत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
-
श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात बैठका सुरु असल्यासंबंधी बोलताना ते म्हणाले “भाजपाने गेल्या सहा महिन्यांपासून १६ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामध्ये श्रीकांत शिंदे यांचाही मतदारसंघ होता. पुढील लोकसभा निवडणूक आम्ही शिवसेना-भाजपा आता युती म्हणून लढणार आहेत. जे आमच्यासोबत आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न असेल. आम्ही आमचा पक्ष मजबूत केला तरी आमची सर्व शक्ती सोबत असणाऱ्या शिवसेनेच्या सर्व खासदारांना निवडून आणण्यासाठीही खर्ची घालणार आहोत”.
-
“या १६ मतदारसंघात बारामती मतदारसंघही आहे. गेल्या दोन्ही निवडणुकीत आम्हाला तिथे चांगली मतं मिळाली होती. या १६ मतदारसंघाला केंद्रीय भाजपाने प्रभारी म्हणून केंद्रीय नेते दिले आहेत. निर्मला सितारमन यांना बारामती मतदारसंघ दिला आहे. त्या सप्टेंबरमध्ये बारामतीला येतील,” अशी माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.
-
फ्रेंडशिप डे असून शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी काहीजण करत असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले “राजकारणात कोण काय म्हणतं याला नाही तर परिस्थिती काय आहे याला महत्त्व नसतं. हा काय बोलला, तो काय बोलला यावर उत्तर द्यायला मी रिकामटेकडा नाही”.
-
(File Photos)
“मी इतका रिकामटेकडा नाही,” शिंदे आणि ठाकरेंसंबंधी ‘तो’ प्रश्न विचारताच फडणवीस संतापले
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर, ओबीसी महासंघाच्या कार्यक्रमात दिलं आश्वासन
Web Title: Bjp devendra fadanvis friendship day maharashtra cm eknath shinde shivsena uddhav thackeray sgy