-
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
-
याचे उद्घाटन मंगळवारी (९ ऑगस्ट) स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते, पुणे मनपा अतिरिक्त महायुक्त विलास कानडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
-
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त अॅड. नंदिनी शहासने व ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. मोहन शेटे, साहित्यिक प्रा.शाम भुर्के, प्रा.डॉ. निवेदिता एकबोटे व उद्योजक संतोष मांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.
-
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनात १२०० हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे.
-
हे प्रदर्शन राजा रवि वर्मा कलादालन घोले रस्ता येथे ९,१०,११, ऑगस्ट रोजी दररोज सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
-
प्रदर्शनाचे उद्घाटन करताना पर्यावरणप्रेमी स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचा गौरव करून सांगितले की ही क्रांतिकारकांची दूर्मिळ छायाचित्रे गावोगावी प्रदर्शित होणे, राष्ट्रभक्तीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचणे आणि हा इतिहासाचा वारसा जपणे आपले कर्तव्य आहे.
-
पुणे मनपाचे अति. महायुक्त विलास कानडे यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रभक्तीचा संदेश पुणे महानगरपालिकेत जास्तीत जास्त ठिकाणी पोचवण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
-
स्वातंत्र्यसेनानी वसंत प्रसादे व डॉक्टर तांबट यांनी सांगितलेल्या स्वातंत्र्य लढ्यातील जिवंत घटना ऐकून श्रोते भारावले.
-
कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या संग्रहातील हा हजारो क्रांतिकारकांच्या छायाचित्राचा ठेवा प्रदर्शनरूपाने डोणजे या गावी कायमस्वरूपी जतन करण्याचे ईश्वरी दिशा आरोग्य संघाचे संतोष पांढरे यांनी सांगितले.
-
दिव्यम्स इंडियन चेंबर्सच्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी हा ‘क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचा ठेवा’ शाळा व महाविद्यालयातून प्रदर्शित करण्यासाठी विशेष उपक्रम राबविणार असल्याचे जाहीर केले.
-
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन
-
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन
-
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचे दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन
Photos : भारतीय क्रांतिकारकांची १२०० हून अधिक दुर्मीळ छायाचित्रे पाहण्याची सुवर्णसंधी
पुण्यात भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
Web Title: Exhibition of photos of more than 1200 freedom fighters in pune pbs