Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. successful siblings in indian politics dpj

कुणी मुख्यमंत्री तर कुणी उपमुख्यमंत्री, ‘या’ भावा-बहिणीच्या जोडींनी भारतीय राजकारणात केलीय कमाल

Updated: August 13, 2022 20:56 IST
Follow Us
  • भारतीय राजकारणात घराणेशाही ही नवीन गोष्ट नाही. एकाच कुटुंबातील अनेक सदस्य भारतीय राजकारणाचे सदस्य आहेत. राजकारणात अतिशय सक्रिय असणारी भावंडांची जोडीही देशात आहे. अशाच काही बहिण भावांच्या जोडीवर एक नजर टाकूया:
    1/11

    भारतीय राजकारणात घराणेशाही ही नवीन गोष्ट नाही. एकाच कुटुंबातील अनेक सदस्य भारतीय राजकारणाचे सदस्य आहेत. राजकारणात अतिशय सक्रिय असणारी भावंडांची जोडीही देशात आहे. अशाच काही बहिण भावांच्या जोडीवर एक नजर टाकूया:

  • 2/11

    राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा हे भाऊ-बहीण काँग्रेसच्या गांधी घराण्यातील आहेत. काँग्रेस हा भारतातील सर्वात जुन्या आणि शक्तिशाली राजकीय पक्षांपैकी एक आहे. या दोघांची गणना मोठ्या नेत्यांमध्ये केली जाते. प्रियांका सध्या काँग्रेसच्या सरचिटणीसपदावर आहेत, तर राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत आणि केरळचे खासदारही आहेत. दोन्ही नेते बहुतेक प्रसंगी एकत्र दिसतात. यावरून त्यांचा विश्वास आणि प्रेम दिसून येते.

  • 3/11

    तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव यांची बहीण मीसा भारती याही राजकारणात सक्रिय आहेत. तेजस्वी यादव हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत.

  • 4/11

    द्रमुकच्या खासदार कनिमोळी आणि एमके स्टॅलिन हेही भावंडे आहेत. स्टॅलिन यांनी त्यांचे वडील एम करुणानिधी यांचा वारसा पुढे नेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून काम सुरू ठेवले आहे.

  • 5/11

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार हेही सख्खे चुलत भाऊ-बहीण आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात या बहिण-भावाची जोडी जास्त सक्रिय आहे.

  • 6/11

    प्रयागराजच्या लोकसभा खासदार रिता बहुगुणा जोशी यांचे भाऊ विजय बहुगुणा हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

  • 7/11

    दोघेही ग्राहक हक्क कार्यकर्ते एचडी शौरी यांची मुले आहेत. नलिनी दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांच्या अँकर होत्या आणि ‘आँखो देखी’ या कार्यक्रमासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचे भाऊ अरुण शौरी हे एक राजकारणी, स्तंभलेखक आणि माजी केंद्रीय मंत्री आहेत.

  • 8/11

    स्वर्गीय माधवराव सिंधिया आणि वसुंधरा राजे यांचा जन्म ग्वाल्हेरच्या शेवटच्या महाराजांच्या पोटी झाला. दोन्ही भावंडांनी त्यांची आई राजमाता विजयराजे सिंधिया यांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात प्रवेश केला. दोघे एकत्र राहत असले तरी राजकारणात आल्यावर त्यांचे मार्ग वेगळे झाले. माधवराव काँग्रेसमध्ये आणि त्यांची बहीण वसुंधरा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

  • 9/11

    भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. त्यांचे वडील ठाकूर प्रसाद पाटणा उच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते आणि भारतीय जनता पक्षाच्या पूर्ववर्ती जनसंघाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक होते. त्यांची बहीण अनुराधा प्रसाद या देशातील प्रसिद्ध पत्रकार आणि BAG फिल्म्स आणि मीडिया लिमिटेडच्या मालक आहेत. अनुराधा या काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांच्या पत्नी आहेत. या भाऊ-बहीण जोडीने आपापल्या क्षेत्रात खूप नाव कमावले आहे.

  • 10/11

    अब्दुल्ला हे काश्मीरमधील सर्वात शक्तिशाली राजकीय कुटुंब आहे. ओमर अब्दुल्ला हे जम्मू आणि काश्मीरचे ११ वे आणि सर्वात तरुण मुख्यमंत्री होते. त्यांची बहीण सारा त्यांच्यापेक्षा लहान आहे. सारा अब्दुल्ला यांचा विवाह काँग्रेसचे दिवंगत नेते राजेश पायलट यांचा मुलगा सचिन पायलटशी झाला.

  • 11/11

    बिहारच्या मुख्यमंत्री राहिलेल्या राबडी देवी यांचे भाऊ साधू यादव हेही राजकारणात सक्रिय आहेत.

TOPICS
प्रियांका गांधी वाड्राPriyankaGandhiराहुल गांधीRahul Gandhi

Web Title: Successful siblings in indian politics dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.