• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai krishna janmashtami dahi handi 2022 jamboree maidan worli shivsena aaditya thackeray vs bjp leader ashish shelar photos sdn

Photos: दहीहंडीच्या दिवशीच शिवसेना विरुद्ध भाजपा संघर्षाची नवी ठिणगी पडणार? आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात…

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर गेली अनेक वर्षे वरळीतील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत होते.

August 17, 2022 10:28 IST
Follow Us
  • Aaditya Thackeray Ashish Shelar Dahi Handi 2022
    1/23

    माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शिवसेनेला धक्का दिला आहे.

  • 2/23

    राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सचिन अहिर गेली अनेक वर्षे वरळीतील जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करीत होते.

  • 3/23

    मात्र न्यायालयाने १४ वर्षांखालील मुलांना दहीहंडीच्या थरामध्ये मज्जाव केल्यानंतर सचिन अहिर यांनी हा उत्सव बंद केला.

  • 4/23

    विधानसभेच्या मागील निवडणुकीत युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली.

  • 5/23

    निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी वरळी परिसरात विकासकामांचा धडाका लावला होता.

  • 6/23

    वरळी परिसरातील माजी आमदार सुनील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत दाखल झालेले सचिन अहिर यांची आमदार म्हणून विधान परिषदेवर वर्णी लागली.

  • 7/23

    दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपद भूषविले होते.

  • 8/23

    त्यामुळे या परिसराला शिवसेनेचा एक खासदार, तीन आमदार लाभले आहेत.

  • 9/23

    माजी महापौर किशोरी पेडणेकर याच परिसरातील प्रभागातून विजयी झाल्या होत्या.

  • 10/23

    तसेच याच परिसरातील माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर यांच्या पदरात बेस्ट समितीचे अध्यक्षपद पडले होते.

  • 11/23

    शिवसेनेची ही मातब्बर मंडळी असतानाही दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने भाजपाने वरळी परिसरात मुसंडी मारली आहे.

  • 12/23

    जांबोरी मैदान आरक्षित झाले नसल्याचे हेरून भाजपने १०-१२ दिवसांपूर्वी ते आरक्षित केले.

  • 13/23

    मुंबई भाजप अध्यक्षपदी अ‍ॅड. आशीष शेलार यांची नियुक्ती नुकतीच झाली असून त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

  • 14/23

    त्यामुळे त्यांनी आधीच भाजप पदाधिकारी संतोष पांडे यांना सूचना देऊन मैदानाचे आरक्षण करून दहीहंडीचे आयोजन केले.

  • 15/23

    आम्ही मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि अन्य सर्व परवानग्या मिळविल्या आहेत, असे पांडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

  • 16/23

    सचिन अहिर यांची दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येत होती.

  • 17/23

    भाजपा दहीहंडीसाठी किती लाखांची पारितोषिके देणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

  • 18/23

    महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्तीची ही दहीहंडी असल्याने आम्ही बक्षिसाची रक्कम अद्याप ठरविलेली नाही, मात्र ती फोडणाऱ्या गोविंदांचा यथोचित सन्मान केला जाईल.

  • 19/23

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ भाजपा नेते या दहीहंडीसाठी येणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली.

  • 20/23

    भाजपाने यंदा मुंबईत ३५० हून अधिक दहीहंड्यांचे आयोजन केले असून मुंबई भाजपने २२७ हून अधिक गोविंदा पथकांचा अपघात विमा उतरविला आहे.

  • 21/23

    याखेरीज मुंबईतील भाजप नेत्यांनी वैयक्तिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असल्याचे मुंबई भाजप अध्यक्ष अ‍ॅड. आशीष शेलार यांनी सांगितले.

  • 22/23

    (सर्व फोटो सौजन्य : ट्विटर)

  • 23/23

    (हेही पाहा : “हे एकनाथ शिंदेंना पटतं का? सत्ता आली म्हणजे मस्ती आली का?”, अजित पवार संतापले)

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayआशिष शेलारAshish Shelarदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisशिवसेनाShiv Sena

Web Title: Mumbai krishna janmashtami dahi handi 2022 jamboree maidan worli shivsena aaditya thackeray vs bjp leader ashish shelar photos sdn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.