• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. jammu kashmir leader gulam nabi azad criticised congress in pc at delhi dpj

Photos : “नरेंद्र मोदींना कठोर समजत होतो, पण त्यांनी माणुसकी दाखवली”; काँग्रेस सोडल्यानंतर आझाद यांच्याकडून कौतुक

काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आझाद यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तर दुसरीकडे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केलं आहे.

Updated: August 29, 2022 18:15 IST
Follow Us
  •  jammu Kashmir leader gulam nabi azad
    1/12

    मोदी हे केवळ बहाणा आहेत. जी-२३ सदस्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिल्यापासून काँग्रेस पक्षाला माझ्यासोबत समस्या होत्या, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे.

  • 2/12

    राजीनाम्यानंतर घर सोडण्यास भाग पाडल्याचा आरोप आझाद यांनी केला आहे.

  • 3/12

    राजीनामा देण्याआधी सहा दिवस झोपलो नाही. काँग्रेस पक्षासाठी मी रक्त सांडवलं आहे, असे आझाद दिल्लीतील पत्रकार परिषदेत म्हणाले.

  • 4/12

    ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज दिल्लीतील पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गांधी कुटुंबीय, काँग्रेस पक्षासोबतच विविध विषयांवर भाष्य केलं.

  • 5/12

    काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षात अनेक बैठका होत होत्या. मात्र, या बैठकांमध्ये माझा एकही सल्ला घेण्यात येत नव्हता अशी नाराजी आझाद यांनी व्यक्त केली.

  • 6/12

    काँग्रेसमधील काही लोक अकार्यक्षम आहेत. पक्षाच्या प्रवक्त्यांना आमच्या विषयी काहीही माहित नसणं वेदनादायी असल्याचं आझाद म्हणाले.

  • 7/12

    “मला मोदी खूप कठोर व्यक्ती वाटायचे, पण ते माणुसकी जपणाऱ्यांमधील आहेत” असे गुलाम नबी आझाद म्हणाले आहेत.

  • 8/12

    राहुल गांधींना आम्ही एक यशस्वी नेता बनवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांनाच रस नव्हता, असा आरोप आझाद यांनी केला आहे.

  • 9/12

    गेल्या ३० वर्षांपासून सोनिया गांधीविषयी असलेला आदर अजुनही कायम आहे. राहुल गांधींच्या दीर्घ आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो, असे आझाद म्हणाले आहेत.

  • 10/12

    जम्मू-काश्मीरातील भाजपाच्या मतदारसंघामध्ये मी एक मतही वाढवू शकत नाही. त्याचप्रकारे माझ्या भागामध्ये तेही प्रभाव दाखवू शकत नाही, असे आझाद यांनी म्हटले आहे.

  • 11/12

    राजीनाम्यानंतर भाजपाच्या वाटेवर असल्याच्या आरोपांना आझाद यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. काँग्रेसमध्ये अशिक्षितांची जमात असल्याची टीका आझाद यांनी केली आहे.

  • 12/12

    काही दिवसांपूर्वी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासोबतच सर्व पदांचा राजीनामा दिला. जम्मू काश्मीरात आझाद नवा पक्ष काढण्याच्या तयारीत आहे. लवकरच त्याबाबतची घोषणा होणार आहे.

TOPICS
राहुल गांधीRahul Gandhiसोनिया गांधीSonia Gandhi

Web Title: Jammu kashmir leader gulam nabi azad criticised congress in pc at delhi dpj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.