Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ganpati bappa arrived at political leaders in maharashtra spb

PHOTO : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह राज्यातील राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन

आज गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी बाप्पाचे आगमन झाले आहे. तसेच राज्यातील राजकीय नेत्यांच्या घरीही मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन झाले.

Updated: August 31, 2022 16:38 IST
Follow Us
  • देशभरात आज गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी आगमन झाले आहे. तसेच राज्यातील राजकीय नेत्यांच्या घरीही मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन झाले.
    1/15

    देशभरात आज गणपती बाप्पाचे मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक मंडळे आणि घरोघरी आगमन झाले आहे. तसेच राज्यातील राजकीय नेत्यांच्या घरीही मोठ्या उत्साहाने गणरायाचे आगमन झाले.

  • 2/15

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना झाली आहे. यावेळी एकनाथ शिंदेंसह खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. शिंदे कुटुंबाने सहकुटुंब गणरायांची आरती केली. यावेळी एकनाथ शिंदेंनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

  • 3/15

    “राज्यातील तमाम गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या मंगलमयी शुभेच्छा”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी राज्यातील गणेश भक्तांना पर्यावरणासह इतर गोष्टींवर भर देण्याचंही आवाहन केलं.

  • 4/15

    एकनाथ शिंदे म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या गणरायाचं घराघरात आगमन होत आहे. त्याच्या कृपेने दोन वर्षांपासून कायम असणारं करोनाचं संकट अखेर दूर झालं आहे. त्यामुळे आपण यंदा गणरायाचं उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत आहोत. गणेशाचं हे आगमन आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवो, अशी प्रार्थना मी श्रींच्या चरणी करतो.”

  • 5/15

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे राजभवनातील निवासस्थान असलेल्या ‘जलभूषण’ येथे बुधवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले.राज्यपाल कोश्यारी यांनी गणरायाचे स्वागत केले तसेच राजभवनातील कर्मचारी व त्यांच्या कुटूबियांसोबत बाप्‍पाची आरती व पूजा केली.

  • 6/15
  • 7/15

    काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनीही मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत केले.

  • 8/15

    भाजपा नेते केशव उपाध्ये यांच्या घरीही बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

  • 9/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी देखील मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केले.

  • 10/15

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा झाली आहे. गेल्या २९ वर्षांपासून आमच्या घरी बाप्पाची प्राणप्रतिष्ठापणा होते आहे. बाप्पाच्या आगमनाने समृद्धीचं वातावरण परिवारात तयार होत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर आलेलं संकट दूर व्हावं, रोगराई दूर व्हावी, चांगले दिवस यावे, हीच इश्वरचरणी प्रार्थना, करतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

  • 11/15

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या घरीही गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. आजपासून राज्यभरात गणेशोत्सवाची सुरूवात होत आहे. ढोल ताशाच्या गजरात मिटकरी यांच्या घरी बाप्पाचं आगमन आगमन झाले.

  • 12/15

    भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या आष्टी येथील निवासस्थानी गणपती बाप्पाचं आगमन झाल आहे. बाप्पाची प्रतिष्ठापना केल्यानंतर धस यांनी गणरायाची पूजा केली. यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारली त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. गणरायाच्या आगमना बरोबरच पावसाचे आगमन होऊन शेतक-याचे संकट दूर व्हावं असं साकडं धस यांनी बाप्पाकडे घातले आहे.

  • 13/15

    साताऱ्यात राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटात झाले आहे. सनई चौघाड्यांच्या निनादात पालखीतून गणेशाची वाजतगाजत मिरवणूक पोवई नाक्यावरील निवासस्थानापर्यंत काढण्यात आली. यावेळी त्यांचे कुटुंबीयदेखील उपस्थित होते.

  • 14/15

    मनेसे नेते राज ठाकरे यांच्या घरीही बाप्पाच्या मुर्तीची प्राप्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी अमित ठाकरे यांनी बाप्पाची आरती ओवाळत पुजा केली.

  • 15/15

    काँग्रेस नेते भाई जगताप यांच्या घरीही गणपती बाप्पाचे आगमन झाले. यावेळी बाप्पाची आरतो ओवाळत गणरायाचे स्वागत केले.

TOPICS
गणेश चतुर्थी २०२५Ganesh Chaturthi 2025गणेशोत्सव २०२५Ganeshotsav 2025मराठी बातम्याMarathi News

Web Title: Ganpati bappa arrived at political leaders in maharashtra spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.