• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. bjp announce news states charges vinod tawade bihar pankaja munde madhya pradesh prakash javadekar keral vijaya rahatkar rajsthan ssa

Photos : मिशन २०२४, महाराष्ट्रातील ‘या’ चार नेत्यांवर लोकसभेची जबाबदारी

Loksabha Election 2024 : भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. यासाठी १५ राज्यांसाठी प्रभारी, सहप्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे.

Updated: September 9, 2022 22:30 IST
Follow Us
  • भाजपा सतत निवडणुकांसाठी तयार असणारा पक्ष आहे. त्यात आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपाने १५ राज्यांसाठी प्रभारी, सहप्रभारींची नियुक्ती केली आहे.
    1/12

    भाजपा सतत निवडणुकांसाठी तयार असणारा पक्ष आहे. त्यात आता २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकासाठी भाजपाने १५ राज्यांसाठी प्रभारी, सहप्रभारींची नियुक्ती केली आहे.

  • 2/12

    त्यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.

  • 3/12

    भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडे बिहारचे प्रभारीपद देण्यात आलं आहे. यापूर्वी ते हरियाणाचे प्रभारी होते.

  • 4/12

    काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांनी भाजपाचा हात सोडला होता. त्यामुळे विनोद तावडेंपुढे बिहारसारख्या राज्यामध्ये सत्ता खेचून आणण्यासाठीचे मोठे आव्हान असणार आहे.

  • 5/12

    तर, भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची मध्यप्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

  • 6/12

    पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेवर घेण्याची मागणी समर्थकांनी केली होती.

  • 7/12

    मात्र, पंकजा मुंडे यांना राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसत आहे.

  • 8/12

    केंद्रात अनेक मंत्रीपदांवर काम केलेले प्रकाश जावडेकर मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज होते. केंद्रीय मंत्रिपदावरून हटवल्यापासून ते पक्षात सक्रिय नव्हते.

  • 9/12

    त्यात आता प्रकाश जावडेकर यांच्यावर केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी दिली गेली आहे.

  • 10/12

    प्रकाश जावडेकर यांना केरळमध्ये डाव्यांचा विरोध मोडून भाजपाचा शिरकाव करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे.

  • 11/12

    राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर भाजपाने राजस्थानच्या सहप्रभारी म्हणून नेमणूक केली आहे.

  • 12/12

    ओपरेशन लोटसच्या प्रयत्नानंतर सुद्धा राजस्थानमध्ये काँग्रेसने सत्ता काबीज ठेवली होती. त्याठिकाणी विजया रहाटकर यांना मोठे परिश्रम करावे लागणार आहे.

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiभारतीय जनता पार्टीBJPमराठीMarathiमराठी बातम्याMarathi News

Web Title: Bjp announce news states charges vinod tawade bihar pankaja munde madhya pradesh prakash javadekar keral vijaya rahatkar rajsthan ssa

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.