-
शिवसेनेवरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी सोलापुरातील तरुणाने चक्क आपल्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो गोंदून घेतले आहेत.
-
सोलापुरातील शेळगी भागात राहणारे बांधकाम मजूर रामन्ना जमादार हे कट्टर आणि कडवट शिवसैनिक आहेत.
-
सध्या राज्यात शिंदे गट आणि शिवसेनेचे सुरू असलेले राजकारण सर्वांना परिचित आहे.
-
अशातच सोलापुरातील शेळगी भागातील कट्टर शिवसैनिक रामन्ना जमादार यांनी आपल्या शरीरावर आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचे टॅटू गोंदवले आहेत.
-
ही टॅटू काढण्यासाठी नऊ दिवसाचा कालावधी लागला.
-
टॅटू गोंदवलेल्या रामन्ना जमादार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना टॅटूची माहिती दिली.
-
ठाकरे यांनी रामन्ना जमादार यांचे कौतुक करत त्यांना शिवसेना वाढवण्याचे आवाहन केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
-
यावेळी उद्धव ठाकरेंनी हाच जोडून या शिवसैनिकाचे धन्यवाद मानले.
-
या शिवसैनिकाने आपल्या पाठीवरील टॅटू आपली शिवसेनेप्रती आणि ठाकरे कुटुंबाप्रति एकनिष्ठा दाखवण्यासाठीकाढले.
-
त्यामुळे शिवसेनेतील बंडखोरीच्या वातावरणात सोलापूरच्या या शिवसैनिकाची चांगलीच चर्चा रंगली आहे.
-
यावेळी खासदार अरविंद सावंतदेखील उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य – आएनओ)
-
(सर्व फोटो सौजन्य – आएनओ)
-
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेही उपस्थित होते.
-
(सर्व फोटो सौजन्य – आएनओ)
Photos : एकनिष्ठा व्यक्त करण्यासाठी पाठीवर गोंदवले उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो…
शिवसेनेवरील निष्ठा व्यक्त करण्यासाठी सोलापुरातील तरुणाने चक्क आपल्या पाठीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो गोंदून घेतले आहेत.
Web Title: Photos of aaditya uddhav thackeray fan from solapur who draw tattoo on back rno news pbs