• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. important 10 statements of bjp state president chandrashekhar bawankule pbs

Photos : अजित पवारांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांवर हल्लाबोल, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची १० महत्त्वाची वक्तव्यं…

चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. त्यातील त्यांच्या १० महत्त्वाच्या विधानांचा आढावा.

September 13, 2022 21:18 IST
Follow Us
  • भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या पक्ष बांधणीच्या कामासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (१३ सप्टेंबर) त्यांनी नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधला.
    1/12

    भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या पक्ष बांधणीच्या कामासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (१३ सप्टेंबर) त्यांनी नंदुरबार येथे माध्यमांशी संवाद साधला.

  • 2/12

    यावेळी बावनकुळेंनी महाविकासआघाडीवर सडकून टीका केली. त्यातील त्यांच्या १० महत्त्वाच्या विधानांचा आढावा.

  • 3/12

    १. सत्ताधारी पक्ष जेव्हा विरोधी पक्षात जातो तेव्हा तो बावचळलेला असतो. त्यांना आपण सत्तेतून गेलोय हे लक्षातच येत नाही – चंद्रशेखर बावनकुळे

  • 4/12

    २. मविआने आधी सांगावं की पहिले १८ महिने तुमचा मुख्यमंत्री मंत्रालयात का आला नाही? त्यांना हे विचारण्याचा अधिकार आहे का? त्यांनी आधी स्वतःच्या चुका पाहाव्यात – चंद्रशेखर बावनकुळे

  • 5/12

    ३. मविआ सरकारमधील पालकमंत्र्यांनी कधीही आपला जिल्हा म्हणून कामच केलं नाही. त्यांनी आपल्या मतदारसंघापुरतंच काम केलं – चंद्रशेखर बावनकुळे

  • 6/12

    ४. करोना संसर्गाच्या काळात लोकं मरत असताना तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंनी १८ महिने महाराष्ट्राचं दर्शन घेतलं नाही. मात्र, या काळात तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आयसीयूत जात होते – चंद्रशेखर बावनकुळे

  • 7/12

    ५. मविआ सरकारच्या काळात नाना पटोलेंच्या समोर त्यांच्या जिल्ह्यात सरकारने धानाचा बोनस बंद केला होता. फडणवीस सरकार शेतकऱ्यांना ७०० रुपये बोनस देत होतं – चंद्रशेखर बावनकुळे

  • 8/12

    ६. अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने काय करावं, पक्षात किती वाद करावेत, घरात वाद करावेत किंवा रस्त्यावर करावेत हा त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही – चंद्रशेखर बावनकुळे

  • 9/12

    ७. काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव गटाने असं म्हटलं की, आम्हाला आमच्या पक्षात राहण्यात रस नाही, तर आम्ही चांगल्या लोकांना नक्की पक्षात घेऊ. मात्र, आम्ही त्यांना फोन करणार नाही, पक्षात या असं कुणी म्हणणार नाही – चंद्रशेखर बावनकुळे

  • 10/12

    ८. महाविकासआघाडीचे कार्यकर्ते मागच्या सरकारला कंटाळले होते आणि या सरकारवर त्यांचा विश्वास आहे. आता दोन्ही सरकारमधील फरक लक्षात घेऊन ज्यांना भाजपात यायचं आहे त्यांना भाजपा प्रवेश देईल – चंद्रशेखर बावनकुळे

  • 11/12

    ९. तुम्हाला काही दिवसात अशा बातम्या मिळतील की तुम्ही डोक्यावर हात ठेऊन म्हणाल हे कसं झालं? जसं सरकारच्या बाबतीत झालं, रात्रीतून मुख्यमंत्र्यांची खुर्ची गेली, तसेच अनेक पक्षप्रवेश भाजपात होतील – चंद्रशेखर बावनकुळे

  • 12/12

    १०. विरोधकांनी काहीच केलं नाही, एकदम प्रामाणिकपणे आयुष्य घालवलं आहे तर ईडी असो की आयटी कुणी कितीही घरी आलं तरी काय फरक पडतो? त्यांनी काही तरी केलं असणार म्हणूनच तुम्ही ईडीला घाबरत आहात – चंद्रशेखर बावनकुळे

TOPICS
भारतीय जनता पार्टीBJPराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPशिवसेनाShiv Sena

Web Title: Important 10 statements of bjp state president chandrashekhar bawankule pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.