• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. nashik bus accident cm shinde visit spot and injured scsg

Nashik Bus Fire Photos: वेदना, सांत्वन अन् अश्रू… CM शिंदेंनी केली घटनास्थळाची पहाणी; जखमींचीही रुग्णालयात जाऊन चौकशी

जखमी प्रवाशांनी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती भेट घेण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना दिली

October 8, 2022 20:01 IST
Follow Us
    Nashik Bus Accident 11 Dead Several Injured As Bus Catches Fire on Aurangabad Road
    नाशिकमध्ये औरंगाबाद रस्त्यावर शनिवारी पहाटे डंपर-खासगी बसच्या अपघातानंतर बस पेटल्याने १३ प्रवाश्यांचा मृत्यू झाला.
  • 1/24

    अपघातानंतर डिझेलची टाकी फुटल्याने बसने पेट घेतल्याचे सांगितले जाते. अपघातग्रस्त बस चिंतामणी ट्रॅव्हलची असल्याची प्राथमिक माहिती आहे. यवतमाळहून ही बस मुंबईला निघाली होती.

  • 2/24

    पहाटे पाचच्या सुमारास पंचवटीतील हॉटेल मिरची चौकात तिला कोळश्याने भरलेल्या डंपरने धडक दिली.

  • 3/24

    सकाळी सव्वा पाच वाजता ती या चौकात अपघातग्रस्त झाली. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. त्यापैकी ११ व्यक्तींचा जागीच मृत्यू झाल्याचं नाईकनवरे यांनी सांगितलं. आसपासच्या नागरिकांनी धाव घेत दोन-तीन जणांना वाचवले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे, असंही आयुक्त म्हणाले.

  • 4/24

    काहींनी उड्या मारल्याने ते बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेची माहिती समजल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.

  • 5/24

    अर्धा ते पाऊण तास पेटलेली बस विझवण्याचे प्रयत्न सुरू होते. मयत प्रवाशांचे मृतदेह मनपाच्या सिटीलिंक बसमधून हलविण्यात आले.

  • 6/24

    आगीत बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.

  • 7/24

    बसमधील ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी संजय बैरागी यांनी सांगितले.

  • 8/24

    या दुर्घटनेत १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भगवान डोईफोडे यांनी दिली.

  • 9/24

    नाशिकचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळहून शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही बस निघाली होती.

  • 10/24

    अपघातानंतर बसने पेट घेतला. गाठ झोपेत असणारे प्रवाशांचा अक्षरशः कोळसा झाला. बसमध्ये ३० प्रवासी होते.

  • 11/24

    प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेतली जात आहे. बस, डंपर व टेम्पो यांच्यात हा विचित्र अपघात झाला. डंपरचालक फरार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

  • 12/24

    राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

  • 13/24

    जळलेल्या बसच्या सांगाडाही मुख्यमंत्र्यांनी पाहिला आणि अपघातासंदर्भातील सविस्तर माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

  • 14/24

    मुख्यमंत्री शिंदेंनी अपघातामध्ये जखमी झालेल्यांनाही भेट देऊन विचारपूस केली.

  • 15/24

    नाशिक जिल्हा सामान्य रूग्णालयात अपघातात जखमी झालेल्यांना दाखल करण्यात आलं आहे.

  • 16/24

    रुग्णांना भेट देताना मुख्यमंत्र्यांबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन हे मंत्रीही होते.

  • 17/24

    मुख्यमंत्र्यांनी अनेक रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांकडून माहिती घेतली.

  • 18/24

    जखमी प्रवाशांनी नेमकं काय घडलं यासंदर्भातील माहिती मुख्यमंत्र्यांना दिली.

  • 19/24

    जिल्हाधिकारी गंगाथरन डी, शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार आदींनी मुख्यमंत्र्यांना रुग्णांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती दिली.

  • 20/24

    जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदेनी जाहीर केलं आहे.

  • 21/24

    केंद्र सरकारच्यावतीने जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. यासंदर्भातील माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्वीटरवरुन दिली आहे.

  • 22/24

    मुख्यमंत्री शिंदेंनी अपघात झालेल्या ठिकाणाचाही पहाणी केली.

  • 23/24

    या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath ShindeनाशिकNashikनाशिक न्यूजNashik News

Web Title: Nashik bus accident cm shinde visit spot and injured scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.