• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. ncp rohit pawar on relations with ajit pawar bjp shivsena maharashtra government sgy

काका अजित पवार आणि तुमच्यात वाद? रोहित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले “त्यांनीच मला…”

रोहित पवार यांनी यावेळी अजित पवारांसोबत असणाऱ्या संबंधांवर केलं भाष्य

Updated: October 18, 2022 18:17 IST
Follow Us
  • Rohit Pawar on NCP Pawar Family
    1/12

    ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रकारे पवार कुटुंबातही फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा दावा केला आहे. शिवसेनेनंतर आम्हाला लक्ष्य केलं जाऊ शकतं अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

  • 2/12

    रोहित पवार यांनी यावेळी अजित पवारांसोबत असणाऱ्या संबंधांवरही भाष्य केलं आहे.

  • 3/12

    तुमच्या आणि अजित पवारांच्या नात्यात दुरावा असल्याची चर्चा अनेकदा झाली. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की “अजित पवारांनीच मला जिल्हा परिषद आणि आमदारकीचं तिकीट दिलं. माझं लग्नही त्यांनीच ठरवलं होतं.

  • 4/12

    “दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठं व्हायचं असतं, तेव्हा आपल्या लोकांसोबत स्पर्धा करायची नसते. आम्ही कौटुंबिक भांडणात वेळ वाया घालवत नाही,” असंही रोहित पवार म्हणाले.

  • 5/12

    पुढे त्यांनी सांगितलं की “आमची सर्वांचं उद्दिष्ट् स्पष्ट आहेत. सुप्रिया सुळेंना लोकसभेत, अजित पवारांना राज्यात आणि मला सध्या जे करत आहे तेच काम करण्याची इच्छा आहे.

  • 6/12

    “पण विरोधकांना ज्याप्रकारे शिवसेनेत दोन गट पाडले, त्याप्रमाणे आमच्या कुटुंबात फूट पाडायची आहे. पवार कुटुंबात अंतर्गत भांडण असेल तर राष्ट्रवादी फुटेल असं विरोधकांना वाटत आहे,” असा दावा त्यांनी केला.

  • 7/12

    “शिवसेनेनंतर आम्ही पुढील टार्गेट असू शकतो”, असा दावाही त्यांनी केला.

  • 8/12

    रोहित पवार यांच्या दाव्यावर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की “रोहितला या विधानामागचा अर्थ नेमका काय आहे ते विचारतो”.

  • 9/12

    “भाजपा, काँग्रेस, मनसे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना या प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करावं,” असंही त्यांनी सांगितलं.

  • 10/12

    “अलीकडच्या काळात वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे,” अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली.

  • 11/12

    मला काही दिवसांपूर्वी किती दिवस सरकार टिकणार असा प्रश्न विचारला होता. त्यावर १४५ चा आकडा आहे तोपर्यंत हे सरकार टिकेल असं मी सांगितलं होतं. पण मी वेगळं काहीतरी बोलल्याचं सांगण्यात आलं. मला काय करायचं आहे. मला खूप काम आहे. त्यांचं त्यांना लखलाभ आणि आमचं आम्हाला,” असंही अजित पवार म्हणाले.

  • 12/12

    (File Photos)

TOPICS
अजित पवारAjit Pawarराष्ट्रवादी काँग्रेस पक्षNCPरोहित पवारRohit Pawar

Web Title: Ncp rohit pawar on relations with ajit pawar bjp shivsena maharashtra government sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.