-
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदार शशी थरुर यांचा पराभव केला आहे.
-
खरगे यांना ७८९७ तर, थरुर यांना १०७२ मते मिळाली आहेत. ४१६ मते बाद करण्यात आली आहे. खरगे हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय आणि विश्वासू नेते समजले जातात.
-
खरगे हे कर्नाटकातील काँग्रेसचे अध्यक्ष होणारे दुसरे व्यक्ती आहेत. यापूर्वी के. ही. एस निजालिंगप्पा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले होते.
-
21 जुलै १९४२ साली मल्लिकार्जुन खरगे यांचा जन्म कर्नाटकमधील गरीब घरात झाला होता. सलग ९ वेळा आमदार झालेले मल्लिकार्जुन खरगे ५० वर्षांहून अधिक काळापासून राजकारण सक्रिय आहेत.
-
वयाच्या ७ व्या वर्षीच खरगे यांनी आपल्या आई आणि कुटुंबातील काही सदस्यांना गमावले होते. शिक्षणासाठी सिनेमागृहात ते काम करत. १९६८ साली खरगे यांचं लग्न झालं. त्यांना दोन मुली आणि तीन मुले आहेत.
-
खरगे यांनी आपली राजकीय कारकीर्द विद्यार्थी संघटनेतून केली होती. १९६९ साली ते एमएसके मिल्स एम्प्लॉईज युनियनचे कायदेशीर सल्लागार बनले. ते संयुक्त मजदूर संघाचे प्रभावी कामगार नेते होते. १९६९ मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले. त्यानंतर गुलबर्गा शहर काँग्रेस कमिटीचे खरगे अध्यक्ष झाले.
-
१९७२ साली गुरुमितकल मतदारसंघातून खरगे यांनी पहिल्यांदा कर्नाटक विधानसभेची निवडणूक लढवली. त्यानंतर २००८ पर्यंत सलग ९ वेळा याच मतदासंघातून विधानसभेवर निवडून गेले.
-
यादरम्यान, खरगे यांनी प्राथमिक शिक्षण राज्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, दोनदा विरोधी पक्षनेते अशा अनेक पदांवर काम केले.
-
२००९ साली गुलबर्गा मतदारसंघातून पहिल्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर २०१४ साली मोदी लाटेत भल्या भल्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र, दुसऱ्यांदा ते गुलबर्गा मतदारसंघातून संसदेत निवडून गेले.
Photos : खरगेंचा अध्यक्षपदापर्यंतचा संघर्ष; ७ व्या वर्षी आईला गमावले, विद्यार्थीदशेत राजकारणाला सुरुवात, ९ वेळा आमदार अन्…
Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांचा काँग्रेस अध्यक्षपदापर्यंतचा संघर्ष सोप्पा नव्हता.
Web Title: Mallikarjun kharge profile who is new congress president mallikarjun kharge know about him ssa