-
शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटातील संघर्ष तीव्र झाला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसत आहेत.
-
शिवसेना पक्षात फूट पडल्यामुळे उद्धव ठाकरे आपल्या गटात जास्तीत जास्त नेत्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न करत आहेत.
-
आगामी विधानसभा तसेच महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे शिंदे गटातील नेत्यांचे राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांना बळ देत आहेत.
-
यवतमाळमधील नेते तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे गटात सामील होत हाती शिबबंधन बांधलं.
-
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. संजय देशमुख हे शिंदे गटातील नेते तथा मंत्री संजय राठोड यांचे राजकीय विरोधक मानले जातात.
-
तर संजय देशमुख यांनीदेखील विदर्भात उद्धव ठाकरे यांचे समर्थक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
-
मागील काही दिवसांपासून बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. माझी ८० वर्षाची आई आहे. रुग्णालयात असताना ती टीव्ही पाहात होती.- संजय देशमुख
-
माझ्या आईला मी शिवसेनेत जाऊ का? असे विचारले होते. तेव्हा माझ्या आईने मला मार्मिक उत्तर दिले होते. तुझा जन्मच शिवसेनेसाठी झाली आहे, असे ती म्हणाली होती, अशी आठवण संजय देशमुख यांनी सांगितली.
-
मागील काही निवडणुकांत संजय राठोड मोठ्या मताधिक्यांने निवडून आले होते. मात्र त्यांच्या पाठीमागे खरी ताकद ही शिवसैनिकांची आहे. – संजय देशमुख
-
घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचे आपण काम करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची नोंद विदेशातही घेण्यात आली आहे, असे म्हणत देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली.
-
घर तिथे शिवसैनिक निर्माण करण्याचे आपण काम करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कामाची नोंद विदेशातही घेण्यात आली आहे, असे म्हणत देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांची स्तुती केली.
-
मी सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन विदर्भात शिवसेनेचे जाळे कसे निर्माण करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे. – संजय देशमुख
-
आपण सर्व मिळून विदर्भात दहा हजार कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी घोषणा संजय देशमुख यांनी केली. (सर्व फोटो- ट्विटर)
उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन! संजय राठोड यांना रोखण्यासाठी यवतमाळमध्ये बड्या नेत्याला दिले बळ
यवतमाळमधील नेते तथा माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांनी आज उद्धव ठाकरे गटात सामील होत हाती शिबबंधन बांधलं.
Web Title: Yavatmal leader sanjay deshmukh joins uddhav thackeray group will for for shivsena expansion prd