• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uddhav thackeray appeal media to provide balasaheb thackeray rare photos and speeches prd

मुंबईतील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी उद्धव ठाकरेंचे विशेष आवाहन, म्हणाले “कृपा करून…”

बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे आज बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा देण्यात आला

November 5, 2022 21:42 IST
Follow Us
  • balasaheb thackeray memorial
    1/16

    बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे आज बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा देण्यात आला. शिवतीर्थाजवळील महापौर बंगल्यात राज्य शासनातर्फे हे स्मारक उभारले जात आहे.

  • 2/16

    एमएमआरडीएला या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील ५८ टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे.

  • 3/16

    या स्मारकामध्ये नेमके काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. असे असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना त्यांच्याकडे असलेले फोटो, मुलाखती स्मारक समितीला देण्याचे आवाहन केले आहे.

  • 4/16

    अनेकजण मला विचारतात की इथे पुतळा कुठे असेल. मी त्यांना सांगतो की येथे पुतळाच नसेल. पुतळा म्हणजे स्मारक नाही. बाळासाहेबांचे फोटो आणून लावले. त्यांनी काढलेले कार्टून आणून ठेवले, त्यांच्या वस्तू आणून ठेवल्या म्हणजे संग्रहालय होतं.- उद्धव ठाकरे

  • 5/16

    हे संग्रहालय म्हणजे स्फूर्तीस्थान असणार आहे. हे संग्रहालय म्हणजे प्रेरणा देणारे स्थान असणारे आहे. – उद्धव ठाकरे

  • 6/16

    काही लोकांना वाटते की स्मारकासाठी वेळ लागत आहे. जेथे स्मारक होत आहे तो महापौर यांचा बंगला आहे. हा बंगला एक वारसा वास्तू आहे. वारसा वास्तूंसाठी काही नियम असतात. – उद्धव ठाकरे

  • 7/16

    वारसा वास्तूच्या मध्ये (लाईन ऑफ साईट) एकही बांधकाम येता कामा नये, असा नियम आहे. या वास्तूला धक्का पोहोचणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. – उद्धव ठाकरे

  • 8/16

    बांधकामासाठी जागा आहे. मात्र सीआरझेडचाही कायदा आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण प्रेरणास्थानासाठी जमिनीखाली जागा उपलब्ध केली आहे. – उद्धव ठाकरे

  • 9/16

    या स्मारकाच्या बाजूला समुद्र आहे. समुद्राचा रेटा खूप जास्त आहे. समुद्राच्या पाण्यापासून, पाण्याच्या दबापासून संरक्षण व्हावे, हे लक्षात घेऊनच बांधकाम करावे लागत आहे.- उद्धव ठाकरे

  • 10/16

    संग्रहालयाला काही धोका पोहोचणार नाही, याचाही विचार करावा लागत आहे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

  • 11/16

    शिवसेना प्रमुख राज्यभर फिरले. त्यांनी ठिकठिकाणी सभा घेतल्या. अनेक पत्रकारांनी त्यांच्या दौऱ्याचे वृत्तांकन केलेले आहे.

  • 12/16

    अनेकांकडे बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो, सुरुवातीच्या काळातील मोर्चे, सीमा आंदोलन, दसरा मेळाव्यातील भाषणं आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची बरीच भाषणं आपल्याकडे आहेत.

  • 13/16

    मात्र यातील काही भाषणं आपल्याकडे नाहीत. दसरा मेळाव्यातील काही भाषणं आपल्याकडे नाहीयेत. तेव्हा रेकॉर्डिंक करणे कठीण होते. बाळासाहेबांची सर्व भाषणं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

  • 14/16

    माध्यमांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या अनेक मुलाखती घेतलेल्या आहेत. त्यातील बऱ्याच मुलाखती उपलब्ध आहेत.

  • 15/16

    मात्र मी तरीदेखील माध्यमांना आवाहन करतो की माध्यमांकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या बातम्या, मुलाखती, काही फोटो असतील तर कृपा करून ते आमच्याकडे द्या. – बाळासाहेब ठाकरे

  • 16/16

    या फोटो आणि भाषणाच्या मदतीने आपण बाळासाहेबांचे उत्तम स्मारक उभारू शकतो, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

TOPICS
आदित्य ठाकरेAaditya Thackerayउद्धव ठाकरेUddhav Thackerayबाळासाहेब ठाकरेBalasaheb ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Uddhav thackeray appeal media to provide balasaheb thackeray rare photos and speeches prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.