-
शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या पोकळीत संधीचं सोनं करत सुषमा अंधारे यांनी शिवसेनेच्या नेत्या म्हणून कमी कालावधीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
-
यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय.
-
वैजनाथ वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
-
शिंदे गटात प्रवेशाची घोषणा करताच वैजनाथ वाघमारे यांनी विभक्त पत्नी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले आहेत.
-
तसेच आगामी काळात पत्रकार परिषद घेऊन सुषमा अंधारेंविषयी सगळं सविस्तरपणे मांडणार असल्याचा इशाराही दिला. वैजनाथ वाघमारे रविवारी (१३ नोव्हेंबर) मुंबईत एबीपी माझाशी बोलत होते.
-
वैजनाथ वाघमारेंनी आरोप केली, “सुषमा अंधारेंनी एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य पद्धतीने त्रास दिला.”
-
“मी त्याच गावात जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे,” अशी घोषणा वाघमारेंनी केली.
-
“या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे काय चीज आहे, कोठून आल्या, काय झालं, कोणी आणलं हे सगळं सविस्तरपणे मांडणार आहे,” असा इशारा वैजनाथ वाघमारेंनी दिला.
-
एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची वेळ आली तर लढणार का? या प्रश्नावर वाघमारे म्हणाले, “तशी वेळ आली तर अगदी निवडणूक लढेन.”
-
“माझे नेते एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे माझा नेता, माझा पक्ष जो निर्णय देतील, जे काम करायला सांगतील ते करेन,” असं मत वैजनाथ वाघमारेंनी व्यक्त केलं.
-
तसेच एकनाथ शिंदेंची भूमिका चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करण्याची आहे. ते सांगतील तसं मी काम करेन,” असं नमूद केलं.
-
माझ्यासमोर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही असू दे, मी निवडणूक लढेन, असंही वाघमारेंनी म्हटलं.
-
“सुषमा अंधारे इतिहासाचे दाखले देते हे तुम्हाला कोणी सांगितलं? इतिहासाचे दाखले द्यायला तिला पुस्तक कोणी दिलं?” असा सवालही वाघमारेंनी अंधारेंना विचारला.
-
या आरोपांनंतर आता एकेकाळचे पती-पत्नी असलेल्या वैजनाथ वाघमारे आणि सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.
-
तसेच राजकीय आरोपांशिवाय व्यक्तिगत आयुष्यातील अनेक विषयही चव्हाट्यावर येऊ शकतात.
Photos : सुषमा अंधारेंवर विभक्त पतीचे गंभीर आरोप, म्हणाले, “एका मंत्र्याला अश्लील आणि अश्लाघ्य…”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी त्यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांना उभं केलंय.
Web Title: Serious allegations on sushma andhare by ex husband after joining eknath shinde faction pbs