-
उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर युती केल्याने बंड केलं, असं सातत्याने शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर सांगतात. यावरून शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी दीपक केसरकारांचा समाचार घेतला आहे.
-
दीपक केसरकर फार गोड बोलतात. ते माझे भाऊ आहेत. पण, त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे.
-
बाळासाहेब ठाकरे यांचं २०१२ साली निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी दीपक केसरकर २०१४ ला शिवसेनेत आले.
-
केसरकर सातत्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करतात. मग ते हे हिंदुत्व शिकले कधी?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी विचारला आहे.
-
उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवायचं आहे. यासाठी महाप्रबोधन यात्रा सुरु आहे.
-
त्यामुळे शिवसैनिकांनी पुन्हा नव्याने कामाला लागण्याचे आवाहन सुषमा अंधारे यांनी केलं.
-
भाजपा कपटी आणि कारस्थान करणारा पक्ष आहे. शिंदे गट माझा भाऊच आहे.
-
शिंदे गटात गेलेल्या लोकांना पश्चाताप होतोय.
-
शिंदे गट भाजपाच्या राजकारणाने त्रासला आहे, असेही सुषमा अंधारे यांनी सांगितलं. त्या कोल्हापुरात बोलत होत्या.
“बाळासाहेबांचं निधन २०१२ ला, केसरकर २०१४ ला शिवसेनेत आले, मग हिंदुत्व कधी शिकले?”
सुषमा अंधारे म्हणतात, “शिंदे गटात गेलेल्या लोकांना…”
Web Title: Sushma andhare attacks deepak kesarkar over hindutva ssa