-
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
-
या भेटीत त्यांनी “राजगृह” या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानातील बाबासाहेबांच्या वस्तूंची पाहणी केली.
-
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, खासदार भावना गवळी, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.
-
याविषयी प्रकाश आंबेडकर म्हणाले, “या भेटीत इंदू मिल येथील प्रस्तावित स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली.”
-
“२००३ ला संयुक्त राष्ट्रात (डरबन, द. आफ्रिका) सामाजिक अजेंड्यावर भारत सरकारला पराभव स्वीकारावा लागला होता,” असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
-
त्या परिषदेला मी उपस्थित होतो. सामाजिक मुद्द्यांवर ती परिषद झाली होती – प्रकाश आंबेडकर
-
त्यावेळी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी याबद्दल माझ्याकडे विचारणा केली होती – प्रकाश आंबेडकर
-
मी अटलबिहारी वाजपेयींना सांगितले होते की, भारताकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषण करणारी कोणतीही संस्था नाही – प्रकाश आंबेडकर
-
भारताकडे केवळ परराष्ट्र खातं आहे. त्यामुळे जगाची जी अपेक्षा होती ती सरकारपर्यंत पोहोचली नाही – प्रकाश आंबेडकर
-
त्यामुळे जोपर्यंत भारताकडे आंतरराष्ट्रीय विश्लेषण करणारी संस्था उभी राहत नाही, तोपर्यंत भारत सरकारचा पराभव होत राहील असे मी वाजपेयींना सांगितले होते – प्रकाश आंबेडकर
-
त्याचवेळी पंतप्रधान वाजपेयींनी इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेबांच्या नावाने आंतरराष्ट्रीय अभ्यास केंद्र उभारावे व त्याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करेल अशा आशयाची नोट तयार केली – प्रकाश आंबेडकर
-
त्या नोटची मी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली – प्रकाश आंबेडकर
-
काँग्रेस,भाजपच्या काळात आतापर्यंत हे शक्य झालेले नाही – प्रकाश आंबेडकर
-
आपल्या कार्यकाळात आपण त्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांना सांगितले – प्रकाश आंबेडकर
-
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत याची जबाबदारी मंत्री दीपक केसरकर यांना दिली – प्रकाश आंबेडकर
-
पुढील आठ दिवसात अहवाल सादर करायला सांगितला – प्रकाश आंबेडकर
-
इंदू मिलमध्ये बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर उभं राहिलं अशी आमची अपेक्षा आहे – प्रकाश आंबेडकर
-
सर्व फोटो सौजन्य – प्रकाश आंबेडकर व एकनाथ शिंदे ट्विटर
Photos : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकरांच्या भेटीत नेमकं काय घडलं? वाचा…
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (१६ नोव्हेंबर) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली.
Web Title: Know what happened in meeting of cm eknath shinde vba prakash ambedkar at rajgruh mumbai pbs