• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uday samant comment on vba prakash ambedkar and uddhav thackeray alliance prd

उद्धव ठाकरे गट-वंचित बहुजन आघाडीतील युतीच्या चर्चेवर उदय सामंतांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “भविष्यात त्यांची…”

राज्यात भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

November 20, 2022 20:05 IST
Follow Us
  • वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार असल्याचे, यापूर्वी म्हटलेले आहे.
    1/12

    वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाशी युती करण्यास तयार असल्याचे, यापूर्वी म्हटलेले आहे.

  • 2/12

    तसा प्रस्तावही त्यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला दिलेला आहे. असे असताना आज (२० नोव्हेंबर) माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर मुंबईत एका कार्यक्रमात एकत्र आले.

  • 3/12

    दरम्यान, राज्यात भिमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  • 4/12

    यावरच शिंदे गटातील नेते तथा मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज (२० नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

  • 5/12

    तर्कवितर्क लावणे योग्य नाही. काही लोक व्यासपीठावर आले म्हणजे युती झाली आणि व्यासपीठावर एकत्र आले नाही तर युती झाली नाही असे नसते, असे उदय सामंत म्हणाले.

  • 6/12

    भविष्यात त्यांची जी भूमिका ठरेल, तेव्हाच आम्ही त्यावर बोलू, असेही उदय सामंत म्हणाले.

  • 7/12

    प्रकाश आंबेडकर यांनी काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न आहे.- उदय सामंत

  • 8/12

    ज्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली, ते आज उद्धव ठाकरेंच्या पक्षात नेते म्हणून काम करत आहेत.- उदय सामंत

  • 9/12

    राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

  • 10/12

    यावरदेखील उदय सामंत यांनी त्यांची भूमिका मांडली आहे.

  • 11/12

    या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी चर्चा करतील.- उदय सामंत

  • 12/12

    आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करणारी लोक आहोत. शिवाजी महाराज यांच्याबद्दल सर्वांनीच आदराने बोलले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे उदय सामंत म्हणाले.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackerayप्रकाश आंबेडकरPrakash AmbedkarशिवसेनाShiv Sena

Web Title: Uday samant comment on vba prakash ambedkar and uddhav thackeray alliance prd

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.