• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. cm eknath shinde praised mla saroj ahire who reached to vidhanbhavan with two year old baby spb

PHOTOS: अडीच महिन्यांच्या बाळासह अधिवेशनाला आलेल्या आमदार सरोज अहिरेंचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक; म्हणाले, “मातृत्वाची जबाबदारी…”

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधानभवनात पोहोचल्या होत्या.

December 19, 2022 15:37 IST
Follow Us
  • विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधानभवनात पोहोचल्या होत्या.
    1/9

    विधिमंडळाचे अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या आमदार सरोज वाघ (अहिरे) या अडीच महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन विधानभवनात पोहोचल्या होत्या.

  • 2/9

    लोकप्रतिनिधी आणि मातृत्व या दोन्ही जबाबदार्‍या एकावेळी पार पाडणाऱ्या सरोज अहिरे यांचं मुख्यमंत्र्यांनी देखील कौतुक केलं.

  • 3/9

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरोज अहिरे यांना आपल्या दालनात बोलवून त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली.

  • 4/9

    “विधिमंडळात लोकप्रतिनिधी म्हणून कायदे बनवणे आणि विधिमंडळाच्या बाहेर मातृत्वाची जबाबदारी पार पाडणे, हे निश्चितच आव्हानात्मक आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

  • 5/9

    “लोकप्रतिनिधीत्व आणि मातृत्व या दोन्ही जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडणे म्हणजे स्त्रीमधील कर्तृत्वाचा आणि मातृत्वाचा अनोखा सन्मान आहे”, असेही ते म्हणाले.

  • 6/9

    यावेळी आमदार संजय बनसोडे आणि आमदार सरोज अहिरे यांचे पती डॉ. प्रवीण वाघ देखील उपस्थित होते.

  • 7/9

    “मी आई आहेच, तसेच आमदारही आहे. त्यामुळे दोन्ही कर्तव्ये महत्त्वाची आहेत. बाळ माझ्याशिवाय राहू शकत नाही.मात्र, याबरोबरच मतदारसंघातील लोकांचे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बाळाला घेऊन यावे लागले”, अशी प्रतिक्रिया सरोज अहिरे यांनी दिली.

  • 8/9

    दरम्यान, प्रशंसक असे बाळाचे नाव असून ३० सप्टेंबर रोजी त्याचा जन्म झाला. अधिवेशन असल्याने सरोज अहिरे या बाळ व पती प्रवीण वाघ यांच्यासह विधानभवनात पोहोचल्या होत्या.

  • 9/9

    कुटुंबीय बाळाला सांभाळतील त्याचवेळी मी सभागृहात मतदारसंघातील प्रश्न मांडणार आहे. लोकांचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यावर माझा भर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeविधिमंडळ अधिवेशनAssembly Session

Web Title: Cm eknath shinde praised mla saroj ahire who reached to vidhanbhavan with two year old baby spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.