-

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर केवळ महाविकासआघाडी सरकार कोसळलं नाही, तर शिवसेना कोणाची हाही प्रश्न उपस्थित राहिला आहे.
-
शिवसेनेवर बंडखोर शिंदे गटानेही दावा केल्याने शिवसेना आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचे यावर आता केंद्रीय निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे.
-
या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत आणि ठाकरे गट कोणत्या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढेल यावर मोठा दावा केला आहे.
-
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आलेल्या संजय शिरसाटांनी मंगळवारी (२० डिसेंबर) माध्यमांशी बोलताना काय म्हटलं याचा हा आढावा.
-
उद्धव ठाकरेंचं नागपूरमध्ये आगमन झालं. मी टीव्हीवर त्यांचं जंगी स्वागत होताना पाहिलं. काल महाविकासआघाडीची बैठक होती, ती झाली नाही – संजय शिरसाट
-
आज ती बैठक झाली असं कळालं. परंतु दुर्दैवाने असं सांगावं लागेल की, उद्धव ठाकरे ज्या पक्षाचं नेतृत्व करत आहेत, त्याच पक्षाच्या कार्यालयात ते गेले नाही. ते काँग्रेसच्या कार्यालयात गेले – संजय शिरसाट
-
उद्धव ठाकरेंनी काँग्रेसच्या कार्यालयाला भेट दिली, पण पक्षाच्या कार्यालयाकडे ते फिरकले सुद्धा नाही – संजय शिरसाट
-
मला वाटतं, उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बेबनाव आहे – संजय शिरसाट
-
बेबनाव असल्यामुळे राष्ट्रवादीबरोबर राहण्याऐवजी काँग्रेसबरोबर राहण्याचा उद्धव ठाकरेंचा मनोदय असावा – संजय शिरसाट
-
पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीत चिन्ह भेटलं नाही, तर उद्धव ठाकरेंचा गट काँग्रेसच्या चिन्हावर लढणार तर नाही ना अशी शंका येत आहे – संजय शिरसाट
-
म्हणूनच आज उद्धव ठाकरे विधानभवनात आले आणि विधान परिषदेत ते जाणार आहेत – संजय शिरसाट
-
ठाकरे कुटुंब एकदा दिलेला शब्द कधी मोडत नाही – संजय शिरसाट
-
दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे असं विधान केलं होतं. आज तेच उद्धव ठाकरे विधान परिषदेत आले आहेत – संजय शिरसाट
-
म्हणजे त्यांनी आज कोणाचं ऐकावं हाही त्यांच्यासमोर पडलेला प्रश्न आहे – संजय शिरसाट
-
कधी संजय राऊत, कधी शरद पवार, कधी अजित पवार, कधी काँग्रेस, कधी राहुल गांधी अशा द्विधा मनस्थितीत ते आहेत. म्हणून ते नागपुरात आले तर त्यांचं स्वागत करुयात – संजय शिरसाट
-
ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांनी पाहिलं की ठाकरे गट चौथ्या क्रमांकावर आहे – संजय शिरसाट
-
भविष्यातील निवडणुकांमध्ये ते चौथ्या क्रमांकाच्या खाली जाऊ नयेत, अशी ईश्वराकडे प्रार्थना करुयात – संजय शिरसाट
-
उद्धव ठाकरे गटाचे आमदार काहिशा भांबावलेल्या स्थितीत आहेत – संजय शिरसाट
-
एकनाथ शिंदेंचा ‘बाळासाहेंबाची शिवसेना’ हा ५० आमदारांचा मोठा गट आहे – संजय शिरसाट
-
दुसरा ठाकरे गट केवळ १५ आमदारांचा आहे. त्यामुळे संख्याबळानुसार आम्हाला अधिवेशनात मोठं कार्यालय दिलं होतं – संजय शिरसाट
-
एकूणच संजय शिरसाटांनी उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटावर हल्लाबोल केला. (छायाचित्र सौजन्य – संजय शिरसाट फेसबूक व संग्रहित)
“…तर उद्धव ठाकरेंचा गट काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढेल”, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरमध्ये आलेल्या संजय शिरसाटांनी मंगळवारी (२० डिसेंबर) माध्यमांशी बोलताना काय म्हटलं याचा हा आढावा.
Web Title: Shinde faction mla sanjay shirsat big claim about uddhav thackeray shivsena party symbol pbs