• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. sushma andhare answer devendra fadnavis over shriram and shrikrishna statement pbs

Photos : “१३ वर्षे तुम्ही झोपला होतात का?”, सुषमा अंधारेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्या मंगळवारी (२७ डिसेंबर) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. त्याचा हा आढावा…

December 27, 2022 23:10 IST
Follow Us
  • शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारें श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.
    1/18

    शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारें श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

  • 2/18

    यानंतर आता सुषमा अंधारेंनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. त्या मंगळवारी (२७ डिसेंबर) सोलापूरमध्ये माध्यमांशी बोलत होत्या. त्याचा हा आढावा…

  • 3/18

    कुठे शिळ्या कढीला उत आणत आहात – सुषमा अंधारे

  • 4/18

    देवेंद्र फडणवीस इतके अभ्यासू आहात, नाही नाही ते सर्व मुद्दे काढले होते. १३ वर्षे तुम्ही झोपला होतात का? आत्ता तुम्हाला हे सर्व सुचतंय का? – सुषमा अंधारे

  • 5/18

    तुम्हाला असं वाटतंय की, तुमच्या या जाळ्यात मी अडकेल, पण अजिबात नाही – सुषमा अंधारे

  • 6/18

    यानंतरही मी चुकतेय असं वाटत असेल, तर मी पुन्हा एकदा सांगते की, भागवत संप्रदायाचा कुठलाही सच्चा वारकरी अजिबात अभद्र आणि अमंगल भाषा बोलत नाही – सुषमा अंधारे

  • 7/18

    हे आहे ते मोहन भागवत संप्रदायाचे धारकरी आहेत – सुषमा अंधारे

  • 8/18

    या धारकऱ्यांनी सुपारी घेऊन काम करणं सुरू केलं असेल, तर मला बाकीच्या भक्तुल्ल्यांविषयी अजिबात बोलायचं नाही – सुषमा अंधारे

  • 9/18

    मात्र, फडणवीसांना माझी विनंती आहे की, मी तुमच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे – सुषमा अंधारे

  • 10/18

    देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरेंबरोबरही चर्चेला बसले नाहीत. कारण फडणवीस खोटारडे आहात. म्हणूनच ते चर्चेला बसत नाहीत – सुषमा अंधारे

  • 11/18

    या सर्व विषयांवर मी फडणवीसांबरोबर चर्चेला बसायला तयार आहे – सुषमा अंधारे

  • 12/18

    फडणवीसांना वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही अभ्यासू मंत्र्याला चर्चेला बसवावं. माझी चर्चा करण्याची तयारी आहे – सुषमा अंधारे

  • 13/18

    देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते याचा आढावा खालीलप्रमाणे…

  • 14/18

    तुमच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात की, राम आणि श्रीकृष्णा थोतांड आहे – देवेंद्र फडणवीस

  • 15/18

    सात महिने अगोदर सीता मातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोरं खात बसतो. तुमच्या नेत्या देवांचा असा अवमान करतात – देवेंद्र फडणवीस

  • 16/18

    कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो. कृष्णा पुन्हा अवतरत का नाही? तो कुठल्यातरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा. तुमच्या नेत्या आमच्या कृष्णाबद्दल असं बोलतात – देवेंद्र फडणवीस

  • 17/18

    यावर तुम्ही काहीही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसले आहात – देवेंद्र फडणवीस

  • 18/18

    फडणवीसांनी विधान परिषदेत केलेल्या या टीकेनंतर गदारोळ होऊन परिषदेतील कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

TOPICS
देवेंद्र फडणवीसDevendra Fadnavisभारतीय जनता पार्टीBJPशिवसेनाShiv Senaसुषमा अंधारेSushma Andhare

Web Title: Sushma andhare answer devendra fadnavis over shriram and shrikrishna statement pbs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.